नवमतदारांसाठी 'माय फर्स्ट व्होट सेल्फी' उपक्रम
   दिनांक :28-Apr-2019
मुंबई ,
 
लोकसभा निवडणुकीत नवीन मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. अशा नवमतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजवावा यासाठी निवडणूक आयोगाने त्यांच्यासाठी अनोखा 'माय फर्स्ट व्होट सेल्फी' उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला आहे.
 
 
 
मतदानाच्या दिवशी म्हणजे सोमवार २९ एप्रिल सकाळी ७ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत ही स्पर्धा असेल. युवा मतदाराने मतदान केल्यानंतर मतदान केद्रांच्या १०० मीटर मर्यादेच्या बाहेर येवून आपला सेल्फी काढावा. तो सेल्फी जिल्हा निवडणूक यंत्रणेच्या [email protected] या ई-मेल अथवा 9372830071/ 9372830071 या व्हॉट्सअॅपवर पाठवावा.
तर दुसरीकडे मतदानाचा टक्का वाढावा यासाठी मुंबईतील एका समाजसेवकाने उद्या जे मतदान करुन येतील, त्यांना एक डझन आंब्याचा पेटीवर एक डझन आंब्याची पेटी मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईत उद्या लोकसभेसाठीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान उद्या मुंबईत पार पडणार आहे.
मतदानाचा टक्का वाढावा यासाठी मसायन भागातील राजेश शिरोडकर यांनी दिली आहे. मुंबईतील सर्वच मतदार संघातील मतदारांसाठी ही ऑफर असणार आहे. मतदान कोणालाही करा, पण मतदान व्हावं म्हणून त्यांनी ही संकल्पना राबवल्याचे त्यांनी सांगितले.