खेल में पॉलिटिक्स...
   दिनांक :28-Apr-2019
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सत्ताकाळात क्रीडाजगताला नेहमीच प्रोत्साहन लाभले नव्हे क्रीडाजगतात चैतन्य निर्माण झाले. खेळाडूंना वेळोवेळी उत्तम मार्गदर्शन, सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. एवढेच नव्हे, तर ऑलिम्पिक, राष्ट्रकुल क्रीडा, आशियाड क्रीडा अथवा विविध खेळाच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भाग घ्यावयास जाणार्‍या भारतीय खेळाडूंना समारंभपूर्वक शुभेच्छा दिल्या आणि जेव्हा सुवर्ण, रौप्य व कांस्यपदक िंजकून मायदेशी परतले तेव्हा त्यांच्या पाठीवर प्रेमाने शाब्बासकीची थाप दिली आहे. खेलो इंडियाच्या निमित्ताने तर देशात क्रीडामय वातावरण निर्माण केले. सतरा वर्षांखालील जागतिक फुटबॉल स्पर्धेचे यशस्वी आयोजनामुळे तर भारताला जगभरातून पसंतीची पावतीच मिळाली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘मन की बात ’च्या माध्यमातून अनेक यशस्वी पण दुर्लक्षित खेळाडूंचा नावानिशी गौरवाने उल्लेख केलेला. आता लोकसभा निवडणुकीत विद्यमान क्रीडामंत्री राज्यवर्धन िंसह राठोड यांच्यासह काही माजी दिग्गज खेळाडूसुद्धा निवडणूक रिंगणात आहेत.
 
 
 
राठोड हे 2004 अॅथेन्स ऑलिम्पिकचे रौप्यपदक विजेते नेमबाज असून देशासाठी पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक रौप्यपदक िंजकणारे ते पहिले भारतीय खेळाडू ठरले. राठोर हे जयपूर ग्रामीण लोकसभा मतदारसंघातून निवडणूक रिंगणात आहे. खेळाडूंच्या अडी-अडचणींविषयी त्यांना उत्तम जाण आहे, म्हणून मोदी सरकारने त्यांच्या खांद्यावर क्रीडा खात्याची जबाबदारी सोपविली. त्यांनी आपल्या कार्यकाळात खेलो इंडिया व टॉप्ससारख्या अनेक योजना यशस्वीरित्या राबविल्या. राठोड यांना आव्हान देण्यासाठी कॉँग्रेसकडून थाळीफेकपटू कृष्णा पुनिया निवडणूक रिंगणात आहे. कृष्णा सदलपूरची विद्यमान आमदार असून तिने आपल्या उमेदीच्या काळात दिल्ली राष्ट्रकुलमध्ये सुवर्ण, तर दोहा आशियाडमध्ये कांस्यपदक पटकावले.
 
सलामी फलंदाज गौतम गंभीर देशावर आलेल्या संकटाप्रसंगी नेहमीच आक्रमक राहतो. त्यातून त्याचे राष्ट्रप्रेम, राष्ट्रभिमन प्रकर्षाने दिसून येतो. दहशतवादी िंकवा नक्षलवाद्यांकडून जेव्हाही भारतीय जवानांवर हल्ला झाला,तेव्हा गौतम गंभीर आक्रमक योद्धाप्रमाणे तुटून पडला आहे. देशाला विश्वचषक िंजकून देण्यात िंसहाचा वाटा उचलणारा गौतम गंभीर आता पूर्व दिल्ली मतदार संघातून भाजपाकडून निवडणूक लढत आहे.
 
बॉक्सर विजेंदर िंसग हासुद्धा निवडणूक रिंगणात उतरला आहे. तो दक्षिण दिल्ली लोकसभा मतदार संघातून कॉंग्रेसच्या तिकीटवर निवडणूक लढवत आहे. विजेंदर आतापर्यंत दहा प्रो-बॉक्सिंग लढतीत अपराजित राहिला आता लोकसभा निवडणूक लढतीत अपराजित राहतो काय, हे बघणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
मिलिंद महाजन