राजस्थान रॉयल्सचा सनरायझर्स हैदराबादवर विजय

    दिनांक :28-Apr-2019
जयपूर, आयपीएल २०१९ :
 दमदार सलामीच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने सनरायझर्स हैदराबादवर विजय मिळवला. मनीष पांडे आणि डेव्हिड वॉर्नर यांच्या दमदार खेळींच्या जोरावर सनरायझर्स हैदराबादने १६० धावांचे आव्हान दिले होते. हे आव्हान राजस्थानने सात विकेट्स राखत पूर्ण केले.
 
 
 
राजस्थानच्या अजिंक्य रहाणे आणि लायम विलिंगस्टोन यांनी संघाला दमदार सुरुवात दिली. या दोघांनी संघासाठी ७८ धावांची सलामी दिली. पण लायम विलिंगस्टोनच्या रुपात राजस्थानला पहिला धक्का बसला. लायम विलिंगस्टोनने २५ चेंडूंत चार चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर ४४ धावा केल्या. त्यानंतर काही अंतराने अजिंक्यही बाद झाला. अजिंक्यने ३४ चेंडूंत ३९ धावा केल्या.
मनीष पांडे आणि डेव्हिड वॉर्नर यांच्या दमदार खेळींच्या जोरावर सनरायझर्स हैदराबादला १६० अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारता आली. राजस्थानकडून श्रेयस गोपाळने दोन विकेट्स मिळवल्या.