डीजेच्या गाण्यावर नाचण्याच्या वादावरून प्राणघातक हल्ला

    दिनांक :28-Apr-2019
 
हिंगणघाट: हिंगणघाट वरून 3 किलोमीटर अंतरावरील कुंभी या गावांमध्ये ताकसांडे यांचे लग्न दिनांक 26 कडाजणा येथे झाले लग्नानिमित्त स्वागत समारंभाचा कार्यक्रम दिनांक 27 ला कुंभी येथे घेण्यात आला त्या प्रसंगी त्याने डीजे चे आयोजन केले होते डीजे च्या गाण्यावर नाचताना आपसात वाद झाल्याने अजय काळे व संदीप आत्रम यांच्यावर चाकूने वार करून जखमी केले या दोघांनाही हिंगणघाट उपजिल्हा रुग्णालय येथे भरती करण्यात आले प्रकृती गंभीर असल्याने या दोघांनाही सेवाग्राम इस्पितळात हलविण्यात आले फिर्यादी गोविल मरस्कोल्हे यांच्या तक्रारीवरून आरोपी निखिल पानतावणे व निखिल लीहित्कर राहणार किन्ही (खारडा)सुरज पानतावणे राहणार नागपूर व एक अनोळखी इसम यांचेवर 307,34 व 296 भा द वि गुन्ह्याची नोंद करण्यात आली घटनास्थळावर पीएसआय अमोल कोल्हे दीपक जंगले नीलेश तेलरांदे उमेश रडके यांनी तपास केला.