'अॅव्हेंजर्स: एन्डगेम'ने तीन दिवसांत कमावले १५७ कोटी
   दिनांक :29-Apr-2019
प्रदर्शनापूर्वीपासूनच चर्चेत असलेला 'अॅव्हेंजर्स: एन्डगेम' हा हॉलिवूडपट दिवसागणिक नवनव्या विक्रमांची नोंद करत आहे. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी ५२ कोटींचा गल्ला जमवून 'अॅव्हेंजर्स : इन्फिनिटी वॉर'चा विक्रम मोडणाऱ्या या चित्रपटानं तीन दिवसांत कमाईचा नवा उच्चांक केला आहे. पहिल्या तीन दिवसांत या चित्रपटानं १५७ कोटींची कमाई केली असून अशी कामगिरी करणारा हा पहिला हॉलिवूडपट ठरला आहे.
 
 
 
बॉक्सऑफिसइंडिया डॉट कॉमच्या अहवालानुसार, चित्रपटाने फक्त वीकेंड्सच्या दिवसात १०४ करोडचा गल्ला जमवला आहे. शनिवारी या चित्रपटानं ५१ कोटी २५ लाख रुपये कमावले. तर रविवारी ५३ कोटींचा आकडा गाठला. आतापर्यंत या चित्रपटानं १५७ कोटींपेक्षा जास्त कमाई केल्याचं सूत्रांकडून समजतं. 'अॅव्हेंजर्स : इन्फिनिटी वॉर'पेक्षा 'अॅव्हेंजर्स : एन्डगेम'ने ६७% जास्त कमाई केल्याचं समोर आलं आहे.