भव्य गांधीला करायचंय या क्षेत्रात करिअर
   दिनांक :29-Apr-2019
तारक मेहता का उलटा चष्मा या मालिकेतील खोडसाळ ‘टप्पू’च्या भूमिकेतून घरोघरी पोहोचलेल्या भव्य गांधीने ‘शादी के सियाप्पे’ या मालिकेतून टीव्हीवर कमबॅक केला आहे. पण आयुष्यभर अभिनय करण्याऐवजी मला दिग्दर्शन करायला जास्त आवडेल अशी इच्छा त्याने व्यक्त केली आहे.
 
 
२०१७ मध्ये चित्रपटांमध्ये अभिनय करण्यासाठी भव्य गांधीने ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या शोचा निरोप घेतला होता. त्यानंतर काही गुजराती चित्रपटांमध्ये त्याने कामंही केलं होतं. आता दोन वर्षांनंतर ‘शादी के सियाप्पे’ या मालिकेतून तो छोट्या पडद्यावर पुनरागमन करतो आहे. तसंच एका गुजराती चित्रपटात कामही करतो आहे. त्याला भविष्यात काय करायचं आहे असं विचारलं असता दिग्दर्शक व्हायला जास्त आवडेल अशी इच्छा त्याने व्यक्त केली आहे.
मी आता जे काम करतो आहे त्यात मी सुखी आहे. पण मला माझ्या कम्फर्ट झोनच्या बाहेर यायचं आहे. माझे अनेक मित्र दिग्दर्शक आहेत. लेखक आहेत. जर सगळ्या गोष्टी जुळून आल्या तर मीही दिग्दर्शक होणं पसंत करीन, असं मत त्याने व्यक्त केलं आहे. लवकरच ‘बाऊ ना विचार’ हा भव्यचा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. हा सिनेमा तारुण्यात पदार्पण करणाऱ्या तीन मुलांच्या आयुष्याभोवती फिरतो आहे.