बिग बॉसच्या घरात दिसणार लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर?
   दिनांक :29-Apr-2019
बहुचर्चित ‘बिग बॉस मराठी’चा दुसरा सिझन लवकरच सुरू होणार आहे. या सिझनमध्ये कोण कोण सहभागी होणार याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये आहे. अशातच कलर्स मराठीने अधिकृत ट्विटर अकाऊंटवर एक प्रोमो प्रदर्शित केला आहे. या व्हिडिओवरून लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर बिग बॉसच्या घरात एण्ट्री करणार असल्याचे तर्क लावले जात आहेत.
 
 
‘आपल्या अदाकारीने भल्याभल्यांचे फेटे उडवलेली नार, बिग बॉस मराठीच्या घरात कुणाकुणाची झोप उडवणार?’ असा प्रश्न विचारत लावणीचा एक व्हिडिओ कलर्स मराठीने पोस्ट केला आहे. सुरेखा पुणेकर यांनी आपल्या लावणीने, अदाकारीने भल्याभल्यांचे फेटे उडवले आहेत. त्यामुळे सुरेखा पुणेकर यांच्या नावाची चर्चा रंगली आहे.
 
 
 
बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या सिझनसाठी छोट्या पडद्यावरील अभिनेता शैलेश दातार, अक्षया गुरव, वीणा जगताप, अर्चना निपणकर, गौतम जोगळेकर यांच्या नावांचीही चर्चा आहे. या शोमध्ये इतर कोण झळकणार हे जाणून घेणं औत्सुक्याचं ठरणार आहे. दुसरं पर्व कधीपासून सुरू होणार हे अद्याप गुलदस्त्यातच आहे. या पर्वाचंही सूत्रसंचालन महेश मांजरेकर करणार आहेत.