BCCIची मोठी घोषणा; प्ले ऑफ व फायनल सामन्यांची वेळ बदलली

    दिनांक :29-Apr-2019
मुंबई, आयपीएल २०१९
 
आयपीएलचे प्ले ऑफ व फायनल सामन्याच्या वेळेत बदल करण्याचा निर्णय बीसीसीआयने सोमवारी घेतला. आधीच्या वेळापत्रकानुसार हे सामने रात्री ८ वाजता होणार होते. ते आता सायंकाळी ७:३० वाजता होतील. प्ले ऑफ सोबतच अंतिम सामना अर्धा तास आधी होणार आहे. तसेच, ७ ते १२ मे दरम्यान सामने होणार आहेत.

 
 
यंदाच्या आयपीएलमध्ये प्रथमच महिलांच्या मिनी ट्वेंटी-२० लीगचे आयोजन करण्यात येणार आहेत. तीन संघांचा समावेश असलेल्या या लीगचे सामने ९ ते ११ मे दरम्यान जयपूर मध्ये होणार आहेत. हेही सामने सायंकाळी ७:३० वाजता खेळवण्यात येतील. मात्र या लीगचा ८ मे रोजी होणारा दुसरा सामना दुपारी ३:३० वाजता सुरू होईल.