IPL 2019; हार्दिक पंड्याने रचला 'हा' इतिहास

    दिनांक :29-Apr-2019
कोलकाताच्या मैदानावरील मुंबईविरुद्धच्या सामन्यात आंद्रे रसल (८०*), शुभमन गिल (७६) आणि ख्रिस लिन (५४) यांनी केलेल्या आक्रमक अर्धशतकी खेळीच्या जोरावर कोलकात्याने २ बाद २३२ धावांचा डोंगर उभा केला आणि मुंबईला २३३ धावांचे आव्हान दिले. त्यांच्या खेळीच्या तोडीस तोड खेळी मुंबईच्या हार्दिक पांड्याने केली. तुफान फटकेबाजीच्या जोरावर हार्दिक पांड्याने ३४ चेंडूत ९१ धावा केल्या. यात ६ चौकार आणि ९ षटकार यांचा समावेश होता. याच फटकेबाजीच्या प्रयत्नात तो माघारी परतला, पण यात त्याने एक विक्रम केला.

 
 
हार्दिक पांड्याला संयमी साथ देणारा कायरन पोलार्ड २० धावांवर झेलबाद झाला. पण हार्दिकने १७ चेंडूत तुफानी अर्धशतक ठोकले. त्यामुळे सामन्यात रंगत वाढली. हार्दिकचे हे अर्धशतक यंदाच्या हंगामातील सर्वात जलद अर्धशतक ठरले. हार्दिक पांड्याने ऋषभ पंत याचा विक्रम मोडला. पंतने मुंबईविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात १८ चेंडूत अर्धशतक ठोकले होते. हा विक्रम हार्दिकने मोडीत काढला.