तैमूरला घेऊन करीना मतदान केंद्रावर
   दिनांक :29-Apr-2019
मुंबईसह महाराष्ट्रातील १७ मतदारसंघांत लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्याचं सध्या मतदान सुरू आहे. बॉलिवूडमधील सर्व तारेतारका मतदानाचा हक्क बजावताना दिसत असून करीना कपूर हिनंही आज मतदान केलं. मतदानाच्या वेळी ती तैमूरलाही सोबत घेऊन आली होती. त्यांचे ते फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

 
 
मतदानासाठी आलेल्या करीनाच्या चेहऱ्यावर गंभीर भाव दिसत होते. करीनासोबत तैमूरला पाहून त्यांची छबी टिपण्यासाठी छायाचित्रकारांची झुंबड उडाली. माध्यामांचे प्रतिनिधी जवळ येताच करीनानं सोबत चालत असणाऱ्या तैमूरला कडेवर उचलून घेतलं. तिचे बॉडीगार्ड्स लोकांना दूर सारण्याचा प्रयत्न करत होते. मतदान करून परतल्यानंतर तिनं तैमूरला कारमध्ये बसवलं आणि त्यानंतर कारजवळ उभं राहून शाई लावलेलं बोट दाखवत कॅमेरासमोर पोझ दिली.