मोहाड़ी येथे पिसाळलेल्या कुत्र्याच्या हैदोस
   दिनांक :29-Apr-2019
मोहाड़ी : येथील मुख्य रस्त्यावरून जाणार्‍या येणार्‍या लोकांना चावा घेऊन जखमी करण्याचा सपाटा एका पिसाळलेल्या कुत्र्याने सुरू केल्याने काही काळ येथे दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते, लोकांनी त्या कुत्र्याच्या पाठलाग करून त्याला पिटाळून लावल्यावर जनतेने सुटकेचा श्वास सोडला, मात्र तो ज्या भागात गेला असेल तेथे ही लोकांना जखमी करेल अशी भीती व्यक्त केली जात आहे, त्या कुत्र्याच्या त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी येथील जनतेने केली आहे
 
 
 
मोहाडी येथील शिवाजी चौक ते गांधी चौकापर्यंतच्या मुख्य रस्त्यावरून जाणाऱ्या येणाऱ्या लोकांना एका पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेण्याचा सपाटा सुरू केला होता, दोन तासात त्याने जवळपास दहा ते बारा लोकांना जखमी केले, त्यापैकी दोन गंभीर जखमी व्यक्तींना भंडारा रुग्णालयात पाठविण्यात आले, रामदयाल गिरीपुंजे ५६ वर्ष यांना सामान्य रुग्णालय भंडारा येथे रेफर करण्यात आले आहे, अन्य एका व्यक्तीचे नाव कळू शकले नाही तर निरंजन चुटे (२५) देवानंद पाटील (२७) अब्दुल सलाम (४५) सदाशिव कामरकर (४५) सह अनेकांना त्या कुत्र्याने चावा घेऊन जखमी केले आहे, सदर कुत्र्याचा त्वरित बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे