IPL 2019; कर्णधार रोहितला दंड

    दिनांक :29-Apr-2019
कोलकात्याच्या ईडन गार्डन्स मैदानावर मुंबईला पराभवाचा सामना करावा लागला. कोलकात्याने विजयासाठी दिलेलं २३३ धावांचं आव्हान पार करताना मुंबईचा संघ १९८ धावांपर्यंत मजल मारु शकला. हार्दिक पांड्याने ३४ चेंडूत ६ चौकार आणि ९ षटकारांच्या मदतीने ९१ धावांची खेळी केली. मात्र त्याच्या या खेळीनंतरही मुंबईचा संघ ३४ धावांनी पराभूत झाला. या सामन्यानंतर मुंबईचा कर्णधार रोहित शर्माला सामनाधिकाऱ्यांनी दंडाची शिक्षा सुद्धा ठोठावण्यात आली.
 

 
रोहित शर्माच्या मानधनातली १५ टक्के रक्कम कापून घेण्यात आली आहे. २३३ धावांचा पाठलाग करताना मुंबईची सुरुवात खराब झाली. हॅरी गुर्नेच्या गोलंदाजीवर रोहित यष्टीचीत असल्याचे अपील करण्यात आले. पंच नितीन मेमन यांनी हे अपील उचलून धरत रोहित बाद असल्याचा निर्णय घेतला. याविरोधात रोहितने तिसऱ्या पंचांकडे दाद मागितली. तिसऱ्या पंचांच्या पाहणीत बॉल लेग स्टम्पला लागत असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे ‘अंपायर्स कॉल’ प्रमाणे रोहितला बाद ठरवण्यात आले. यावेळी रोहितने रागाच्या भरात आपल्या बॅटने स्टम्प तोडला.