नवमतदार अर्जुन आणि साराने बजावला मतदानाचा हक्क
   दिनांक :29-Apr-2019
मुंबईसह देशभरात लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात मतदान सुरु आहे. या टप्प्यात ७१ जागांसाठी सोमवारी मतदान होत असून सकाळी ७ वाजता या मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. राज्यातील हा अखेरचा टप्पा असून यासाठी मुंबई, ठाण्यासह १७ मतदारसंघांतील ३२३ उमेदवारांचे राजकीय भवितव्य सुमारे तीन कोटी ११ लाख मतदार ठरवत आहेत. याच मतदान प्रक्रियेत सहभागी होत मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर याने सहकुटुंब मतदान केले. यंदाच्या मतदान प्रक्रियेत सचिनचा मुलगा अर्जुन आणि मुलगी सारा यांनी प्रथमच मतदान केले.
 
 
मतदान प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर सचिनने सहकुटुंब फोटोसाठी पोझ दिली. तसेच सगळ्यांनी मतदान करायलाच हवे. हे आपले कर्तव्य आहे. त्यामुळे आपण आपल्या देशासाठी हे कर्तव्य बजावायलाच हवे, असा संदेश सचिनने दिला. सचिनने तयार होऊन मतदानाला निघण्याआधीही एक व्हिडीओ पोस्ट केला होता.