श्रीलंका ब्लास्ट: महिलेने सैन्याला दिले ५ कुत्रे भेट
   दिनांक :29-Apr-2019
कोलंबो,
श्रीलंकेमध्ये झालेल्या स्फोटांच्या पार्श्वभूमीवर एका महिलेने श्रीलंकन सैन्याला ५ जर्मन शेफर्ड भेट म्हणून दिले आहेत. या कुत्र्यांनाप्रशिक्षण देऊन बॉम्ब निकामी करणाऱ्या पथकामध्ये वापरण्यात येईल अशी माहिती श्रीलंकन सैन्याने दिली आहे.

 
 
श्रीलंकेत ईस्टरच्या पवित्र सणाला ८ स्फोट झाले होते. ज्यामध्ये २५०हून अधिक लोकं मृत्यूमुखी पडले होते.त्यानंतरच्या काही दिवसांत श्रीलंकन सैन्याने अनेक जीवंत बॉम्ब निकामी केले होते. श्रीलंकन सैन्याच्याया कर्तृत्वावर खुश होऊन डॉ. शिरू विजेमन्ने या महिलेने तिचे पाळीवप ५ जर्मन शेफर्ड श्रीलंकन सैन्याला भेट देण्याचा निर्णय घेतला. यातील सगळ्यात छोटा कुत्रा सहा महिन्यांचा आहे तर सगळ्यात मोठा कुत्रा दोन वर्षांचा आहे. आपण आपल्या देशाच्या संरक्षणासाठी इतका हातभार नक्कीच लावू शकतो अशी भावनाप्राध्यापिका असलेल्या विजेमन्नेने व्यक्त केली आहे. या कुत्र्यांनी येत्या काळात प्रशिक्षण दिलं जाणार आहे. ब्रिगेडिअर अमरसेकरा यांनी या महिलेच्या घरी जाऊन ही भेट स्वीकारली आहे.