आजचे राशी भविष्य, दि. ०३ एप्रिल २०१९
   दिनांक :03-Apr-2019
 
 
मेष : आज तुम्हाला शुभवार्ता मिळू शकेल. पुढे जाण्यासाठीच्या खूप चांगल्या संधी साथीदाराची साथ मिळेल. आज केलेली गुंतवणूक पुढे फायद्याची ठरेल. नशीबाची साथ मिळेल. मेहनत करा, अर्थार्जनाच्या चांगल्या संधी आहेत. तणाव कमी असेल.
 
वृषभ : कामाच्या ठिकाणी जपून काम करा. पैशांची काळजी घ्या. आज होणारा खर्च आर्थिक अडचणीत टाकू शकेल. कोणतं ना कोणतं काम सतत सुरू आहे. आक्रमक स्वभाव ठेवू नका.
 
मिथुन : नोकरीच्या ठिकाणी काम जास्त असेल. जास्त मेहनत करावी लागणार आहे. स्वत:ची काळजी घ्या. अर्थार्जनासाठी सोप्या सहज मार्गाचा वापर करु नका. दिवसातील जास्तीत जास्त वेळ इतरांसाठी खर्च होईल. सावध राहा.
 
 कर्क : कामाच्या ठिकाणी दिवस चांगला असेल. नवं काम मिळेल. जुनी कामं पूर्ण कराल. मेहनतीचं फळ मिळेल. असं काही काम कराल ज्यामुळे साथीदाराच्या नजरेत तुमचं स्थान आणखी भक्कम होईल. नशीबाची साथ मिळेल.
 
सिंह : नोकरदार वर्ग आणि व्यवसायिकांसाठी हा दिवस शुभ आहे. मित्रांच्या मदतीने धनलाभ होऊ शकतो. वरिष्ठांची मदत मिळेल. दिवस चांगला असेल. साथीदारासोबत असणारे संबंध आणखी दृढ होतील. विचारात असणारी कामं पूर्ण होतील. आरोग्य चांगलं असेल.
 
कन्या : कार्यक्षेत्रात चढ- उतार पाहायला मिळतील. अचानक कोणतं नुकसान होऊ शकतं. सावधगिरीने काम करा. दैनंदिन कामांमध्ये काही अडचणी येतील. नोकरीच्या ठिकाणी काही गोष्टी माहित होतील.
 
तूळ : व्यापारात अचानक फायदा होऊ शकतो. सहकाऱ्यांची मदत होईल. तुमची व्याप्ती आणखी वाढवण्याचा विचार करा. प्रेमसंबंध आणखी सुधारण्याची संधी मिळेल. ज्या प्रश्नांची उत्तरं हवी आहेत ती मिळतील.
 
वृश्चिक : मेहनतीने नोकरीच्या ठिकाणी फायदा मिळेल. दीर्घ काळासाठी चालणारे काही बेत आखाल. पैसे आणि नोकरीशी संबंधित उपयुक्त असे सल्ले मिळतील. अनेक प्रश्नांची उत्तरं मिळतील. येत्या दिवसांमध्ये आर्थिक स्थिती सुधारेल. आरोग्याची काळजी घ्या.
 
धनु :  व्यवसायात सावधगिरी बाळगा, कामकाज जास्त असण्यामुळे काही अडचणीही येऊ शकतात. कोणताही विचार न करता कोणाच्याही बोलण्यावर विश्वास ठेवू नका. सावधगिरी बाळगा. कामं मनाप्रमाणे होण्यास काहीसा वेळ दवडला जाऊ शकतो. कोणा एका कामासाठी स्वत:हून पुढाकार घेण्यासाठी संकोच ठेवू नका.
 
मकर : कामकाजात तणाव वाढेल. अवाजवी खर्च वाढेल. कामात काही अडचणी येतील. काही जुन्या गोष्टींमुळे तुम्ही दुखी असाल. आरोग्यात चढ- उतार असतील.
 
कुंभ : अडकलेली कामं पूर्ण होतील. स्वत:वर विश्वास ठेवा. तुमच्यासाठी दिवस सकारात्मक असेल. कुंटुंबातील लोक तुमची मदत करतील. आप सकारात्मक आणि आनंदी असाल. वैवाहिक आयुष्यात सुखी असाल. गुडघे आणि सांधेदुखीचा त्रास सतावेल.
 
मीन : नोकरीच्या आणि व्यापाराच्या बाबतीत तुम्हाला फायदा होईल. आखलेली कामं पूर्ण होतील. धनलाभ होण्याची शक्यता आहे. ज्या कामांच्या बाबतीत अडचणी असतील ती इतरांच्या मदतीने पूर्ण होतील.