हवामान बदलविषयक मंत्र्यावर हल्ला
   दिनांक :03-Apr-2019
न्यूझीलंडचे हवामान बदलविषयक मंत्री जेम्स शॉ यांच्यावर एका अज्ञात व्यक्तीने हल्ला केला आहे. जेम्स शॉ संसद भवनात जात असताना एका व्यक्तीने भेटण्याच्या निमित्ताने त्यांना थांबवले व त्यांच्या नाकावर जोरदार ठोसा मारला. या हल्यानंतर लगेचच त्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली. या प्रकरणानंतर जेम्स यांना तात्काळ रुग्णालयात दाखल केले.
 
 
जेम्स यांच्यावर हल्ला करणारा व्यक्ती ४७ वर्षांचा आहे. त्या वक्तीच्या मते काही दिवसांपूर्वी न्यूझीलंडमधील मशिदीमध्ये झालेल्या हल्ल्याला मंत्री जेम्स शॉ जबाबदार होते. या हल्ल्याचा प्रतिशोध घेण्यासाठी त्याने जेम्सवर हल्ला केला. शॉ ग्रीन पार्टीचे सह-नेते आहेत. ग्रीन पार्टीच्या प्रवक्त्यांनी जेम्स शॉ यांच्यावर हल्ला करणाऱ्या व्यक्तीने केलेले आरोप फेटाळून लावले. तसेच तसेच शॉ यांच्या डोळ्यावर ठोसा मारल्याने त्यांचा डोळा काळानिळा झाला आहे. सध्या त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे.
 
 
न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा आर्डर्न यांनी या घटनेबाबत आपला निशेध नोंदवला आहे. यावर प्रतिक्रीया देताना न्यूझीलंडमध्ये अशा घटना घडण्याची तुम्ही अपेक्षाही करू शकत नाही. राजकीय मोकळेपणाच्या संस्कृतीला यामुळे मोठा धक्का बसला आहे. या घटनेमुळे मंत्र्यांपर्यंत सहज पोहचू शकण्याच्या बाबीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे, असे त्या म्हणाल्या.