मी समलिंगी नाही; जेम्स फॉकनरचा खुलासा

    दिनांक :30-Apr-2019

 
 
नवी दिल्ली,
ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू जेम्स फॉकनर याने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला. त्याच्या फोटोवरून क्रिकेट जगतात  चांगलेच वादळ उठले आहे. त्या फोटोवरून त्याच्यावर वैयक्तिक टिपणी करत चुकीचे तर्कवितर्क लावले जात असल्याने त्याने दुसरा आणखी एक फोटो शेअर करत उलट-सुलट सुरू असलेल्या चर्चेला पुर्णविराम दिला आहे.
 
 
 
जेम्स फॉकनर याने रविवारी जन्मदिनाचे औचित्य साधून आपल्या मित्रांसमवेत एक फोटो आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला. फोटो शेअर करतेवेळेस काहीतरी हटके कॅप्शन देण्याच्या नादात त्याने Birthday dinner with the boyfriend (best mate!!!) अशी कॅप्शन दिली. याच कॅप्शन वरून तो समलिंगी असल्याचा तर्क विर्तक लावण्यात आला.
 
 
 
या गोष्टीवर फॉकनर याने आणखी एक फोटो शेअर करत स्पष्टीकरण दिले. तो म्हणाला, मी शेअर केलेल्या फोटोचा अर्थ चुकीचा लावण्यात आला असल्याचे सांगत मी समलिंगी नाही असा खुलासादेखील त्याने केला आहे. मात्र, LGBT कम्युनिटीला मिळणारा पाठींबा पाहून मी आनंदी आहे. प्रेम हे प्रेम असते, याची जाणीव कायम असायला हवी. रॉब हा माझा चांगला मित्र आहे. आमच्या मैत्रीला काल पाच वर्ष पूर्ण झाली,'' असेही फॉल्कनरने लिहिले.