#IPL2019: प्लेऑफ व अंतिम सामन्यांच्या वेळापत्रकात बदल

    दिनांक :30-Apr-2019
नवी दिल्ली,
आयपीएलच्या प्ले ऑफ व अंतिम सामन्यांच्या वेळेत बीसीसीआयकडून बदल करण्यात आला आहे. हे सामने आता आधी निश्‍चित करण्यात आलेल्या वेळेपेक्षा अर्धा तास अगोदर सुरू होणार आहेत. वेळापत्रकानुसार हे सामने रात्री ८.०० वाजता होणार होते. ते आता सायंकाळी ७.३० वाजता सुरू होणार आहेत. प्ले ऑफ सोबतच अंतिम सामना अर्धा तास आधी होणार आहे. तसेच, ७ ते १२ मे दरम्यान सामने होणार आहेत.
 
 
यंदाच्या आयपीएलमध्ये प्रथमच महिलांच्या मिनी ट्‌विटी-२० लीगचे आयोजन करण्यात आले आहेत. यात तीन संघांचा समावेश असून या लीगचे सामने ९ ते ११ मे दरम्यान जयपूर येथे होणार आहेत. हेही सामने ७.३० वाजता खेळवण्यात येतील. मात्र या लीगचा ८ मे रोजी होणारा दुसरा सामना दुपारी २.३० वाजता खेळविण्यात येणार आहे, अशी माहिती बीसीसीआयकडून देण्यात आली.