राष्ट्रवादीचे आमदार हणुमंत डोळस यांचे निधन

    दिनांक :30-Apr-2019
पंढरपूर,
सोलापूर जिल्ह्यातील माळशिरसचे आमदार हणुमंतराव डोळस (वय ५८) यांचे आज मुंबईतील सैफी रुग्णालयात निधन झालं. पोटाच्या कर्करोगानं आजारी असलेल्या डोळस यांच्यावर गेल्या काही महिन्यांपासून उपचार सुरू होते.  

 
 
माळशिरस मतदारसंघ राखीव झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून २००९ मध्ये डोळस यांना पहिल्यांदा उमेदवारी देण्यात आली होती. अनुसूचित जातीसाठी आरक्षित असलेल्या माळशिरस मतदारसंघातून डोळस हे 2014 मध्येही मोठ्या मताधिक्याने विजयी झाले होते. २००९ मध्ये विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या जागी त्यांनी निवडणूक लढवली होती.
 
डोळस यांनी चर्मकार महामंडळ आणि म्हाडाचे अध्यक्ष म्हणून काही वर्षे काम केले होते. माळशिरस तालुक्यातील दसूर हे डोळस यांचे मूळ गाव असून त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी, एक भाऊ व चार बहिणी असा परिवार आहे.