जपानमधले बाहुल्यांचे गाव
   दिनांक :30-Apr-2019
फिरारे इंटरनॅशनल 
- निलेश जठार 
9823218833 
 
नमस्कार मंडळी जपान तसे आपले मित्र राष्ट्र आणि अतिशय सुरेख असा देश जपानची बहुतांश शहरांची पुनर्रचना करण्यात अली आहे. त्यामुळे जपानमध्ये फिरताना तुम्हाला सुनियोजित शहरांची शृंखला दिसेल. आज ‘फिरारे इंटरनॅशनल’मध्ये आपण जपानची सैर करणार आहोत आणि एका अशा शहराची माहिती घेणार आहोत जिथे लाखोंनी भावल्या तुम्हाला जागोजागी दिसेल. जपानच्या राजधानी पासून साधारण 277 किलोमीटर अंतरांत एक प्रांत आहे ज्याचं नाव आहे शिकोकू. 
 
 
या प्रांतात तुम्हाला उत्तम जेवण, कमीदरात राहण्याची व्यवस्था होईल. साधारण भारतीय रुपयापेक्षा जापनीज करन्सी स्वस्त असल्यामुळे जपानला फिरायला जाणार्‍यांमध्ये भारतीय मोठ्या प्रमाणात आहेत. साधारण एका दिवसाचा खर्च अंदाजे 3 ते 4 हजार भारतीय रुपये ह्या प्रमाणे येतो. जपानमध्ये प्रत्येक शहराला बस, ट्रेन आणि विमान सेवेने उत्तमरित्या जोडली गेली आहेत. शिवाय स्थानिक दळणवळण व्यवस्थापण उत्तम आहे. आपण एकटेच जपानमध्ये फिरायला गेले असाल तर तुम्ही कमी खर्चात बिनधास्त एक आठवडा फिरू शकता. जपानला भारतीय लोकांसाठी 60 ते 75 दिवसांसाठी सहज व्हिसा उपलब्ध होतो. जपानला साधारण 12 अशी शहर आहेत, जिथे तुम्ही पर्यटनाचा आनंद घेऊ शकता. त्यातीलच एक नाव म्हणजे नागोरो.
 
 
 
जपानच्या शिकोकू प्रांतातील नागोरो हे गाव एका 69 वर्षांच्या आजीमुळे बाहुल्यांचे गाव म्हणून प्रसिद्धीस आले आहे. अर्थात या मागची कहाणी कुणाच्याही डोळ्यांना पाणी आणणारी आहे. मात्र, या आजीने तिच्या अजब कृतीने या गावाकडे पर्यटकांना आकर्षून घेण्याचे महत्त्वाचे कार्य केले आहे. गेली 16 वर्षे या आजीबाई करत असलेले प्रयत्न आता सार्थकी लागले, असे म्हणता येईल. या गावाची लोकसंख्या अवघी 27 आहे, मात्र त्याच्या दसपटीने म्हणजे 270 विविध आकाराचे, वयाचे पुतळे या आजीने गावात उभारले आहेत.
 
69 वर्षांची, आयनो सुकिनी नावाची ही आजी सांगते, आमच्या गावात सर्वात लहान वयाची व्यक्ती 55 वर्षांची आहे. गावात तरुण नाहीत आणि लहान मुलेतर नाहीतच. एकेकाळी येथे 300 लोक राहत होते. त्यावेळी वन खात्यात आणि धरणाचे बांधकाम सुरू होते. त्यामुळे कामगार होते. येथील काम संपले आणि रोजगाराच्या शोधात लोक गाव सोडून शहरात गेले. त्यामुळे गाव ओसाड पडले. गावात कुणी आहे, असे वाटावे आणि एकटेपणा दूर व्हावा म्हणून आयनो ने ठिकठिकाणी माणसाच्या आकाराच्या बाहुल्या बनवून त्या ठेवायला सुरवात केली.
लाकडी काटक्या, वर्तमानपत्रे, इलॅस्टीक, कापड आणि लोकर यांचा वापर करून ती या बाहुल्या किंवा पुतळे बनविते. एक मोठी बाहुली बनविण्यासाठी तिला तीन दिवस लागतात. पश्चिम जपानच्या डोंगरी भागातील हे गाव आता ‘व्हॅली ऑफ डॉल्स’ं, म्हणून प्रसिद्धीस आले असून जगभरातून पर्यटक येथे आवर्जून भेट देऊ लागले आहेत.