यात्रा टांगीनाथ धामची
   दिनांक :30-Apr-2019
स्थापत्यकलेचा उत्तम नमुना असलेली अनेक मंदिरं भारतात आहेत. खजुराहोची मंदिरं वास्तूकलेला उत्तम नमुना म्हटली पाहिजे. देशातल्या प्रत्येक राज्यात वैशिष्ट्‌यपूर्ण मंदिरं आहेत. राजस्थानातील राजसमंद आणि पाली जिल्ह्याच्या सीमेवर एक मंदिर वसलंय. भगवान परशुरामाने या मंदिराची निर्मिती केल्याचं बोललं जातं. परशुच्या सहाय्याने खडक कापून परशुरामाने हे मंदिर उभारलंय. ‘टांगीनाथ धाम’ या नावाने हे मंदिर ओळखलं जातं. पाली जिल्ह्यापासून 100 मीटर अंतरावर हे मंदिर वसलंय. कुंभलगडपासून हे मंदिर अवघ्या 10 किलोमीटर अंतरावर आहे. या मंदिरात परशुरामाच्या परशुचं दर्शनही घेता येतं. म्हणूनच या मंदिरात भाविकांची बरीच गर्दी झाल्याचं पहायला मिळतं.
 
 
 
भगवान परशुरामाला विष्णूचा अवतार मानलं जातं. परशुरामाने पृथ्वी नि:क्षत्रिय केली होती. हे मंदिर एका गुहेत आहे. या मंदिरापर्यंत जाण्यासाठी 500 पायर्‍या चढाव्या लागतात. परशुरामाने त्रेतायुगात कठोर तपश्चर्या केली होती. शिवलिंग  समोर ठेऊन तपश्चर्या केली होती. हे शिवलिंग या मंदिरात पहायला मिळतं. राजस्थानात या मंदिराचं मोठं महत्त्व आहे. परशुरामाने स्थापन केलेेल्या शिवलिंगाचं दर्शन घ्यायचं असेल तर या मंदिराला भेट द्यायला हवी. पण यासाठी राजस्थानातल्या पालीमध्ये जायला हवं. परशुरामाच्या अस्तित्त्वाने पावन झालेलं हे स्थान बरंच प्रसिद्ध आहे. याठिकाणी गेल्यावर परशुरामाच्या अस्तित्त्वाची जाणीव होत राहते. असं हे अनोखं मंदिर शिवभक्तांसाठी पर्वणीच आहे.