अल्लीपुरात पोलिस शिपायांवरच गुन्हा दाखल
   दिनांक :30-Apr-2019
जबरदस्ती पैसे वसुली केल्याबाबत पोलीस कर्मचारी फरार
वर्धा,
अल्लीपुर पोलीस स्टेशन मध्ये दोन पोलीस शिपायांवर जबरदस्ती पैसे वसुली प्रकरणी पोलिस नीरक्षक प्रवीण डांगे यांनी कलम ३९४,४४८,३४ अंतर्गत गुन्हा दाखल केला. कात्री येथील ग्रामस्थानी मारल्याचा धक्कादायक प्रकार वर्धा जिल्ह्यात अल्लीपुर या गावी घडला आहे .


 
सचीन सुरकार व राजरतन खडसे असे मारहाण झालेल्या पोलिस शिपायांची नावे आहेत. हे दोघे शिपाई स्टेशन डायरीत नोंद न करता व साध्या वेशात कात्री गावात गेले. तेथे मासेविक्रेते दिवसभरात मासे विक्री करून मिळालेल्या पैश्यांची मोजणी करत होते. या दोन्ही शिपायांनी त्यांचेकडून पैसे हिसकावण्याचा प्रयन्त केला, त्यामुळे मासे विक्रेत्यांचे पैसे न देता पोलिसांना मारहाण केली. यात पोलिस शीपाई राजरतन खडसे गंभीर जखमी झाले आहे. त्यांना सेवाग्राम येथील रुग्णालयात भरती करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे.
 
घडलेल्या प्रकाराबाबत अल्लीपुर पोलिस स्टेशन ठाणेदार प्रवीन डांगे यांनी सांगीतले की, फीर्यादी सुनंदा शंकर डायरे रा. कात्री यांच्या फिर्यादीवरून दोन्ही पोलिस शिपायांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघेही फरार आहे. त्यांना लवकरात लवकर ताब्यात घेण्यात येईल. यासोबतच कात्री येथील ज्या मासेविक्रेत्यांनी पोलिसांना मारहाण केली अश्या २० लोकांवर कलम ३५३ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. यातील सहा लोकांना अटक करण्यात आली आहे.