अबू अल बगदादी जिवंत; श्रीलंका स्फोटांची जबाबदारीही स्वीकारली
   दिनांक :30-Apr-2019
 
 

 
 
मुंबई : पाच वर्षांआधी अमेरिकेने सीरियावर केलेल्या हवाई हल्ल्यामध्ये आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेटचा म्होरक्या अबू अल बगदादी याचा खात्मा झाल्याचे जाहीर केले होते. परंतु तो फक्त जिवंतच नसून तर अगदी ठणठणीत आहे. एक व्हिडिओ करून त्याने श्रीलंकेमध्ये घडवलेल्या साखळी बॉम्ब स्फोटाची जबाबदारी स्वीकारली आहे. आता पर्यंत अनेकदा बगदादीच्या मारल्या गेल्याच्या बातम्या समोर आल्या आहे, परंतु मृत्यूला हुलकावणी देत तो परत हैदोस घालत असतो.  
सीरियातील आयसिसच्या तळांना नष्ट केल्याचा सूड उगवण्यासाठी श्रीलंकेतील स्फोट घडवल्याचं बगदादीने व्हिडिओमध्ये केला आहे. आयसिसने या हल्ल्याची जबाबदारी आधीच स्वीकारली होती.