पोलिसांच्या गाडीला ट्रकची धडक
   दिनांक :30-Apr-2019
ब्रम्हपुरी : मध्यरात्री १२ नंतर ठाणेदार प्रमोद मकेश्वर व तीन पोलीस सहकाऱ्या सोबत रात्रीची गस्त घालीत असताना पॉलिटेक्निक कॉलेज जवळ त्यांच्या वाहनाला धान कटाई च्या मोठ्या ट्रक ने धडक दिली त्यात ब्रह्मपुरी पोलिस स्टेशनचे ठाणेदार प्रमोद मकेश्वर व तीन पोलीस सहकारी गंभीर रित्या जखमी झाले. अपघात एवढा भयानक होता की पोलीस वाहनाचा समोरील भाग पूर्णपणे चकणाचुर झाला. सर्व सहकारी रोडवर जखमी अवस्थेत होते. याच दरम्यान नागभिड वरून ब्रह्मपुरीकडे येत असताना पत्रकार प्रशांत डांगे व त्यांच्या पत्नी प्रा सरोज डांगे यांनी गाडी थांबवून मदत करण्यास सुरुवात केली. त्यांनी तत्काळ ब्रह्मपुरी पोलिस स्टेशनला फोन केला व एका खाजगी वाहनाला थांबवून ठाणेदार प्रमोद मकेश्वर व अन्य दोन सहकाऱ्यांना दवाखान्यात पाठवले. लगेचच ब्रह्मपुरी पोलिस स्टेशनचे कर्मचारी गाडी सहित घटनास्थळी दाखल झाले व बाकी जखमींना ब्रह्मपुरी ख्रिस्तानंद दवाखान्यात भरती करण्यात आले.