बुरहान वाणीच्या भूमिकेत दिसणार पाक खासदार
   दिनांक :30-Apr-2019
 
 

 
 
इस्लामाबाद: २०१७ मध्ये काश्मीरमध्ये सोशल मीडियाचा वापर करणारा दहशतवादी 'बुरहान वाणी' याच्या भारतीय लष्कराने खात्मा केला होता. बुरहान हा तरुणांना भडकाऊ भाषण देऊन दहशतवादात सामील करून घ्यायचा. बुरहानचा खात्मा केल्यानंतर पाकिस्तानात त्याला शाहिद संबोधले गेले होते. या दहशदवाद्याच्या  आयुष्यावर पाकिस्तानात चित्रपटाची निर्मिती करण्यात येते आहे. या चित्रपटात कराचीचे खासदार आमिर लियाकत हुसैन प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.