आजचे राशी भविष्य, दि. ३० एप्रिल २०१९
   दिनांक :30-Apr-2019

मेष - कामाच्या गोष्टींवर चर्चा कराल. सकारात्मक राहण्याचा प्रयत्न करा. नवीन अनुभव येण्याची शक्यता आहे. व्यवहार चांगला ठेवाल तर पुढे जाण्याची संधी मिळेल. प्रवास करावा लागेल.

वृषभ - दररोजच्या कामात काही बदल होतील. चिंता करु नका, विश्वास ठेवा आणि पुढे जा. जुन्या गोष्टी विसरण्यातच फायदा आहे. काही चांगले बदल होतील. नवीन कामांसाठी योजना आखाल. जवळपासच्या लोकांचे सहकार्य मिळेल. दिवस चांगला जाईल. चांगली बातमी मिळेल.

मिथुन - प्रत्येक कामासाठी शारीरिक आणि मानसिकरित्या तयार राहावे लागेल. जोडीदारासोबत संबंध मजबूत होतील. उत्पन्नाच्या बाबतीत समस्या संपण्याची शक्यता आहे. स्वत:च नको असलेली स्थिती बदलू शकता. व्यवसायात वाढ करण्यासाठी मेहनत केली असल्यास त्याचे चांगले फायदे होतील.

कर्क - करियरमध्ये चांगल्या संधींची शक्यता आहे. अनेक दिवसांपासून एखाद्या कामासाठी करत असलेल्या प्रयत्नांत यश मिळेल. समस्या संपतील. यशस्वी व्हाल. पैशांच्या बाबतीत तणाव राहील. भावंडांची मदत मिळेल. जवळच्या संबंधांमुळे खुश व्हाल.

सिंह - .दिवस शुभ आहे. जीवनात काही नवीन बदल होऊ शकतात. अनेक दिवसांपासून बंद असलेल्या कामाची सुरुवात होऊ शकते. जितक्या लोकांशी बोलाल, भेटाल, चर्चा कराल तितके यशस्वी व्हाल. अनुभवी लोकांचा सल्ला फायद्याचा ठरेल.

कन्या - जुन्या समस्यांचे निराकरण होईल. मित्र किंवा जोडीदाराला वचन देऊ शकता. कुटुंबासोबत अधिक वेळ घालवण्याचा प्रयत्न कराल तर फायदा होईल. एखाद्याची मदत करु शकता. गरज पडल्यास तुम्हालाही मदत मिळू शकते.

तुळ - ऑफिसमध्ये तुम्ही दिलेल्या सल्ल्यावर विचार केला जाईल. नवीन व्यवसाय करण्यासाठी दिवस चांगला आहे. आत्मविश्वास वाढेल. गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या समस्या संपतील. वेळे जाईल तशा समस्याही सोडवल्या जातील.

वृश्चिक - नोकरी, व्यवसायात तुमच्यासोबत काही नव्या गोष्टी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे फायदा होईल. नवीन लोकांशी ओळख होईल. धनलाभ होऊ शकतो. आज झालेले बदल फायद्याचे ठरतील. कोणत्याही गोष्टीवर खुलेपणाने विचार करा.

धनु - दिवस चांगला आहे. नोकरी, व्यवसायात प्रगतीच्या दृष्टीने दिवस चांगला आहे. एखादी समस्या असल्यास सोडवण्याचा पूर्ण प्रयत्न करा. लोकांची साथ मिळेल. महत्त्वाच्या गोष्टींमध्ये जोडीदाराचा सल्ला घ्या. आई-वडिलांच्या तब्येतीची काळजी घ्या.

मकर - रखडलेली कामं पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. कामासाठी अधिक वेळ आणि मेहनत घ्यावी लागेल. घरातील सामानाची खरेदी होऊ शकते. प्रवासाची शक्यता आहे. वेळ मिळाल्यास काही वेळ एकटे राहण्याचा प्रयत्न करा.

कुंभ - संथ गतीने चाललेल्या कामात गती येईल. फायदा होण्यासाठी काही ना काही मार्ग काढण्याचा प्रयत्न करत राहाल. गुंतवणूकीबाबत आधी केलेल्या योजनांचा फायदा होऊ शकतो. दिवस आनंदात जाईल. प्रयत्न करत असलेल्या कामात यश मिळेल.

मीन - कामं पूर्ण होतील, त्याचा फायदा होतील. करियरसाठी चांगल्या संधी मिळतील. एकाग्रता वाढेल. पैशांची समस्या कमी होईल. स्थितीत आधीपेक्षा चांगले बदल होतील. विचार केलेली कामं पूर्ण होतील. एखाद्याला तुमच्याकडून भावनात्मक मदतीची गरज वाटू शकते