घटांगच्या जंगलात भीषण आग
   दिनांक :30-Apr-2019
धारणी,
मेळघाटातल्या घटांग रेंजच्या बिहाली गावलगतच्या जंगलात रविवारी मध्यरात्रीनंतर भीषण आग लागली. या वणव्याची धग आज मंगळवारी सकाळपर्यंत कायम होती.
 
 
या आगीमुळे नैसर्गिक वनसंपदा मोठ्या प्रमाणात खाक झाली आहे. आसमंतात धुराचे लोट गर्दी करीत आहे. सरपटणारे जीव व पक्षी सैरभैर झाले आहे. या घटनेची माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने आग विझविण्यासाठी विविध उपाययोजना केल्या. काही प्रमाणात आगीवर नियंत्रण मिळविण्यात अधिकाऱ्यांना यश आले.
 
जंगलात ठिकठिकाणी असलेल्या झाडांवरचे मोहाफुल गोळा करणे शक्य व्हावे, यासाठी जंगलात आग लावण्यात आल्याचा असल्याचा संशय व्यक्त होत आहे. आगीमुळे मोठ्या प्राण्यांवर भटकंतीची वेळ आली आहे. वन औषधीचेही मोठे नुकसान झाले आहे. आगीवर पूर्ण नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरू आहे.