प्रभास झाला भावूक
   दिनांक :30-Apr-2019
नुकतंच ‘बाहुबली : द कन्क्लुजन’ या चित्रपटाला दोन वर्षे पूर्ण झाली. या चित्रपटाच्या प्रदर्शनाचा दिवस माझ्यासाठी कायम भावनिक असेल, अशी प्रतिक्रिया प्रभासने व्यक्त केली आहे. याविषयी इन्स्टाग्राम अकाऊंटवर त्याने एक पोस्टसुद्धा लिहिली आहे.
 
 
‘बाहुबली २’चा पोस्टर शेअर करत त्याने कॅप्शनमध्ये लिहिलं, ‘दोन वर्षांपूर्वी बाहुबली : द कन्क्लुजन हा चित्रपट प्रदर्शित झाला. हा दिवस कायम माझ्यासाठी भावनिक असेल. एस. एस. राजामौली आणि संपूर्ण टीमचा मी ऋणी आहे. माझ्यावर आणि चित्रपटावर प्रेमाचा वर्षाव करणाऱ्या चाहत्यांचे खूप खूप आभार!’ प्रभास, राणा डग्गुबती, अनुष्का शेट्टी, तमन्ना, सत्यराज आणि रम्या यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाने तीन दिवसांत ५०० कोटींहून अधिक रुपयांची विक्रमी कमाई केली होती. तर प्रदर्शनाच्या दिवशीच या चित्रपटाने १०० कोटींचा गल्ला जमवला होता.