सपना चौधरी करणार भाजपात प्रवेश
   दिनांक :30-Apr-2019
मुंबई : मध्यंतरी हरयाणवी लोकगायिका आणि डान्सर सपना चौधरी काँग्रेसमध्ये जाणार याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात होती.  त्यानंतर ती भाजपच्या वाटेवर असल्याचेही बोलले जात होते. आता मात्र या चर्चेला पूर्णविराम लागला असून  सपना चौधरी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे असल्याचे दिल्ली भाजपचे अध्यक्ष मनोज तिवारी यांनी स्पष्ट केले आहे. 
 

 
मनोज तिवारी यांनी एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत हा गौप्यस्फोट केलाय. ते म्हणाले, 'मी तुम्हाला ब्रेकिंग न्यूज देतो आहे. सपना चौधरी मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश करणार आहे.' सपना चौधरी भाजपमध्ये जाणार हे जरी निश्चित झाले असले तरी तिला लोकसभेचे तिकीट मिळणार का हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. परंतु, सपनाचा चाहतावर्ग पाहता तिला तिकीट मिळेल अशी शक्यता सूत्रांकडून वर्तवण्यात येत आहे.