शर्मन जोशी करतोय मराठी नाटक क्षेत्रात प्रवेश
   दिनांक :30-Apr-2019
 
बॉलिवूडच्या अनेक चित्रपटांना आपल्या अभिनयाच्या जोरावर न्याय देणारा स्टार आणि रंगभूमीवर मनापासून प्रेम करणारा अभिनेता शर्मन जोशी मराठी नाट्यवर्तुळात प्रवेश करतोय. सुप्रसिद्ध नाट्यलेखक-दिग्दर्शक केदार शिंदे एक नवीन मराठी नाटक घेऊन येत असून, त्याची निर्मिती शर्मन करणार आहे. ‘वाजले की बारा’ असे या नवीन नाटकाचे नाव आहे. ‘द प्ले दॅट गोज राँग’ या लंडन-अमेरिकेत गाजलेल्या नाटकाचा हा अधिकृत रिमेक असल्याचं शर्मनने सांगितले .  केदार शिंदे दिग्दर्शित हे नाटक जुलै-ऑगस्टदरम्यान प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
 

 
 
या नाटकाच्या कास्टिंगचं काम सध्या सुरू आहे. यापूर्वी केदार-शर्मन या जोडीनं भारतामध्ये गुजराती आणि इंग्रजी भाषेत हे नाटक सादर करण्याची यशस्वी कामगिरी करून दाखवली आहे. शर्मनची ही पहिलीच मराठी नाट्यनिर्मिती आहे. ‘तू तू मी मी’, ‘सही रे सही’, ‘लोचा झाला रे’, ‘श्रीमंत दामोदर पंत’, ‘गेला उडत’ यांसारखी दर्जेदार नाटकं दिल्यानंतर केदार हिंदी आणि गुजराती नाटकांकडे वळवला होता. ‘वाजले कि बारा’च्या निमित्ताने  केदार शिंदे तीन वर्षांनंतर पुन्हा एकदा मराठी रंगभूमीकडे परतला आहे. ‘गेल्या वर्षभरापासून शर्मनला मराठीत नाटक करायचे होते. मी जेव्हा ‘द प्ले दॅट गोज राँग’ मराठीत आणायचे ठरवले, तेव्हा त्यानं स्वतःहून याची निर्मिती करायचा निर्णय घेतला.