१९ लाख ५० हजारांची रोकड कोल्हापुरात जप्त
   दिनांक :04-Apr-2019
 

 
 
 
 
 कोल्हापूर :  कोल्हापूरच्या गगनबावडा इथे नीता ट्रॅव्हल्समधून १९ लाख ५० हजार रुपयांची रोख जप्त केल्याने एकाच खळबळ उडाली आहे. सूत्रांच्या माहिती नुसार मध्य प्रदेशच्या संतोषकुमार पटेल याच्याकडे ही रोकड सापडली आहे. संतोष सध्या पोलिसांच्या ताब्यात असून पोलीस त्याची कसून चौकशी करीत आहे. 
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थिर निरीक्षण पथकाची तपासणी सुरू होती. त्यादरम्यान हा प्रकार उघड झाला आहे. यामध्ये २ हजाराच्या २२५ तर पाचशे रुपयाच्या ३ हजार नोटा जप्त करण्यात आल्या आहेत.