निवडणुकीत उमेदवारीसाठी सर्वपक्षीय आयाराम-गयाराम
   दिनांक :04-Apr-2019
सुजय विखे-पाटील - नगरमधील भाजपचे उमेदवार आहेत. सुजय विखे-पाटील यांच्या तीन पिढ्या कॉंग्रेसमध्ये होत्या, सुजयचे वडील आणि आजोबा शिवसेनेकडून राज्यात आणि केंद्रात मंत्रीही होते.
 
 
 
प्रताप पाटील चिखलीकर - नांदेडचे भाजपचे उमेदवार. मूळ कॉंग्रेसचे असलेले प्रताप पाटील चिखलीकरांनी शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेकडून ते लोहा-कंधार मतदारसंघातून आमदार आहेत. आता त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असून नांदेडमध्ये लोकसभा निवडणुकीत अशोक चव्हाणांना आव्हान दिलं आहे.
भारती पवार - िंदडोरीतील भाजपच्या उमेदवार. भारती पवार यांनी 2014 साली राष्ट्रवादीकडून लोकसभेची निवडणूक लढवली होती. तसेच त्यांचे सासरे दिवंगत ए. टी. पवार हे राष्ट्रवादीचे आमदार होते.
कांचन कुल - बारमतीच्या भाजपच्या उमेदवार कांचन कुल यांचे पती राहुल कूल पूर्वी राष्ट्रवादीत होते. 2014 ची विधानसभा निवडणूक राहुल यांनी महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाकडून लढवली होती. तसेच कांचन कुल यांच्या सासू राष्ट्रवादीच्या आमदार होत्या, तर सासरे कॉंग्रेसचे आमदार होते.
हिना गावित - नंदुरबारमधून भाजपच्या उमेदवार. हिना गावित यांचे वडील विजयकुमार गावित हे राष्ट्रवादीमध्ये होते. मागील निवडणुकीतच गावित कुटुंबाने भाजपमध्ये प्रवेश केला. हिना गावित यांना भाजपने पुन्हा नंदुरबारमधून संधी दिली आहे.
संजय काका पाटील - सांगलीचे भाजपाचे उमेदवार संजय काका पाटील हे राष्ट्रवादीचे आमदार होते. त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मागील वेळीही त्यांनी भाजपमधून निवडणूक लढवली होती.
ओमराजे िंनबाळकर - उस्मानाबादमधील शिवसेनेचे उमेदवार. ओमराजे िंनबाळकर मागील अनेक वर्षे शिवसेनेत आहेत. मात्र त्यांचे वडील पवनराजे पूर्वी कॉंग्रेसमध्ये होते.
संजय मंडलिक - कोल्हापूरमधील शिवसेनेचे उमेदवार. संजय मंडलिक यांचे वडील सदाशिवराव मंडलिक राष्ट्रवादीचे खासदार होते.
धनंजय माने - हातकणंगलेचे शिवसेनेचे उमेदवार. धनंजय माने यांच्या आई निवेदिता माने राष्ट्रवादीच्या खासदार होत्या व आजोबा कॉंग्रेसचे खासदार होते.
नरेंद्र पाटील - सातारचे शिवसेनेचे उमेदवार. नरेंद्र पाटील हे पूर्वी राष्ट्रवादीचे आमदार होते. त्यानंतर त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला, आता ते शिवसेनेकडून निवडणूक रिंगणात उतरले आहेत.
राजेंद्र गावित - पालघरमधील शिवसेनेचे उमेदवार. कॉंग्रेसमध्ये असलेल्या राजेंद्र गावित यांनी पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपात प्रवेश केला. भाजपकडून ते खासदारही झाले. मात्र आता ते शिवसेनेच्या तिकीटावर पालघरमधून रिंगणात आहेत.
सुभाष वानखेडे - िंहगोलीतून कॉंग्रेसचे उमेदवार सुभाष वानखेडे हे मूळचे शिवसैनिक आहेत. शिवसेनेतून ते आमदार आणि खासदार होते. नंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि आता कॉंग्रेसमध्ये आले आहेत.
नाना पटोले - नागपूरमधून कॉंग्रेसचे उमेदवार मूळचे कॉंग्रेसचे असलेले नाना पटोले यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. 2014 च्या निवडणुकीत भंडारा गोंदियातून ते भाजपकडून खासदारही झाले. मात्र आता ते स्वगृही परतले आहेत.
संजय निरुपम - उत्तर-पश्र्चिम मुंबईतून कॉंग्रेसचे उमेदवार. मूळचे शिवसेनेचे असलेले संजय निरुपम शिवसेनेला जय महाराष्ट्र करून कॉंग्रेसमध्ये आले असून गेली अनेक वर्षे ते कॉंग्रेसमध्ये आहेत.
संजय िंशदे - माढ्यातील राष्ट्रवादीचे उमेदवार संजय िंशदे. भाजपाच्या जोरावर जिल्हापरिषदेचं अध्यक्षपद मिळवणार्‍या संजय िंशदे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करून माढाची उमेदवारी मिळवली आहे.
रणजितिंसह मोहिते पाटील - कोणत्याही पक्षात नसलेल्या याशिवाय या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीबरोबर असलेल्या सोलापुरातील मोहिते-पाटील घराण्यातील रणजितिंसह मोहिते पाटील यांनी भाजपात प्रवेश केला आहे. तर फलटणच्या रणजित िंनबाळकर यांनी कॉंग्रेसला रामराम ठोकून भाजपात प्रवेश केला आहे.निवडणुकीत आकड्यांना फार महत्त्व असतं. आकडेच सत्तेपर्यंत पोहचवत असतात. त्यामुळे आपल्या पक्षाचा आकडा वाढवण्यासाठी सारेच पक्ष उत्सुक असतात. कॉंग्रेसला गटबाजीचा फार पुरातन काळापासून शाप लागला आहे. त्यामुळे आता कॉंग्रेस आणि मूळचा कॉंग्रेसमध्येच असलेला राष्ट्रवादी पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते अन्य पक्षात जात आहेत. चांगल्या उमेदवारांची कुणालाही गरज असतेच.
पप पप