चैत्र पाडवा...
   दिनांक :04-Apr-2019
राठी नववर्षाची सुरुवात गुढीपाडव्याला होते. सर्वत्र उत्साहाचे वातावरण असते. सकाळी उठून सडासंमार्जन, अंगणात सुंदर रांगोळ्या काढून नववर्षाचे स्वागत केले जाते. सकाळपासूनच घरात गुढी उभारण्याची लगबग सुरू असते. सर्वजण एकमेकांना नववर्षाच्या शुभेच्छा देतात.
1 जानेवारीला आपले व्यावहारिक नववर्ष सुरू होते. परंतु त्याचे स्वागत मात्र आपण आळसाने करतो. कारण 31 डिसेंबरला रात्रभर िंधगाणा घातल्यावर सकाळी लवकर उठणे शक्य नसते. गुढीपाडव्याला मात्र याच्या अगदी उलट वातावरण असते. घराघरात उत्साहाने या दिवसाचे स्वागत केले जाते. साडेतीन मुहुर्तापैकी एक संपूर्ण मुहूर्त असल्याने या दिवसाला अधिकच महत्त्व आहे. त्यामुळेच लोक या दिवशी नवीन वस्तूंची खरेदी करतात.
गुढीपाडवा साजरा करण्याची अनेक कारणे आहेत. या दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली अशी आख्यायिका आहे. 14 वर्षांचा वनवास संपवून प्रभू रामचंद्र सपत्नीक अयोध्येला परत आले होते. रावणावर मिळविलेल्या विजयामुळे आनंदीत झालेल्या नगर जनांनी संपूर्ण अयोध्या नगरीत विजयाची गुढी उभारून श्रीरामचंद्रांचे स्वागत केले. या दिवसाची आठवण म्हणून आपण दरवर्षी गुढीपाडवा साजरा केला जातो.
 
 
 
चैत्र महिना म्हणजे उन्हाळ्याची सुरुवात. या दिवसात आंब्याच्या झाडाला नवी पालवी फुटते, कैर्‍या लागतात. वातावरणातील उष्मा वाढल्याने त्याचे शरीरावर देखील परिणाम होतात. म्हणूनच या दिवसात कैरीचे पन्हे, कडुिंलबाच्या पानांचा रस आदींचे सेवन केले जाते.
शालीवाहन नावाच्या एका कुंभाराच्या मुलाने मातीचे सैन्य तयार करून त्यावर पाणी िंशपडले त्यांच्यात प्राणांचा संचार केला व शत्रूला पराभूत केले. त्यांच्या विजयाप्रीत्यर्थ या दिवसापासून शालीवाहन शक सुरू झाले.
मानवाने सर्वप्रथम स्त्रीच्या रूपाची पूजा करायला सुरुवात केली. ती स्त्री म्हणजे आदिशक्ती, आदिमाता पार्वती असे मानले जाते. त्यामुळे पाडव्याच्या दिवशी पार्वतीच्या शक्तिरूपाची पूजा करतात. यालाच चैत्र नवरात्र म्हणतात.
गुढीपाडवा हा शेतकर्‍यांसाठीही अतिशय महत्त्वाचा सण असतो. गावखेड्यात याला मांडवस असे म्हणतात. या दिवशी शेतीत काम करणार्‍या मजुरांचा पगार, कुणाला ठेवायचे िंकवा कुणाला बदलायचे हे शेतकरी ठरवितात.
गुढीपाडव्याला अनेक जण काहीतरी संकल्प करतात. ते पूर्णत्वास जाण्याकरिता ते प्रयत्नशीलही असतात. नववर्षानिमित्त सर्वांच्या जीवनात आनंद, सुखसमृद्धी येवो आणि सर्वांना दीर्घायुरारोग्य लाभो, हीच सदिच्छा.
मीरा टोळे