आल्लाददायक लस्सी
   दिनांक :04-Apr-2019
फाल्गुन गेला की वातावरणात बदल होतो, उष्णतेचे प्रमाण वाढते. गरम वारे, भाजून काढणारे ऊन्ह या तडाख्यात विसावा देणारे आणि शरीराला तरलता प्रदान करणारे ग्रीष्मातील शीतपेय आहे. या पेयांमध्ये विविध प्रकार आपल्याला दिसून येतात. यातीलच एक प्रकार म्हणेज लस्सी आहे. पारंपरिक लस्सीला वेगवेगळी चव देऊन आपण पित असतो. आजच्या तरुणाईला म्हणा वा लहान मोठे सर्वांना या पारंपरिक पदार्थांना त्याच्या आवडीचा टच आला की- मग पार्टीत असो वा घरी ते आवडीने प्यायले जातात. तर मग आज आपण पारंपरिक लस्सीला आवडीप्रमाणे दिल्या जाणार्‍या फ्लेवरचे काही प्रकार पाहूया.
 
 
 
दही, साखर, बर्फ पाणी या साहित्यांपासून तयार होणार्‍या पारंपरिक लस्सीला ग्राईंडरने न फेटता रवीने फेटा त्यामुळे आपण तयार करत असलेल्या लस्सीची कंस्टीटन्सी योग्य बनेल.
आंबा लस्सी : पिकलेल्या आंब्यांचा गर त्यात थोडी साखर आणि लस्सीचे मेन मिश्रण एकत्र केले की झाली आंबा लस्सी.
कैरी लस्सी : कच्च्या कैरीचा गर, थोडी साखर आणि आवडीनुसार जिरे आणि मेन लस्सीचे मिश्रण यांना एकत्र करून झाली कैरी लस्सी तयार.
चॉकलेट लस्सी : डेरीमिल्क (तुम्हाला आवडत असलेले मेल्टेड चॉकलेट) एका ग्लासला दहा वड्या, न्युट्रेला चॉकलेट, क्रिम दोन चमचे यांना गॅसवर मंद आचेवर चॉकलेट वितळेपर्यंत फेटून मुळलस्सीच्या मिश्रणात ऐकजिव केले की झाली चॉकलेट लस्सी तयार.
मसालेदार लस्सी : कोिंथबीर, पदीना, एक हिरवी मिर्ची, एक इंच आल्याचा तुकडा, काळे मीठ, चाट मसाला, मिरे पावडर, जिरे पावडर या मसाल्यांना लाटण्याने बारीक पेस्ट करून ती पेस्ट मेनलस्सीमध्ये घातली की झाली मसालेदार लस्सी तयार.
बबलगम लस्सी : बबलगमचा फ्लेवर देण्याकरीता त्यात बबलगम सिरप एका ग्लासला काही थेंब आणि आवडेल त्या रंगाचे सिरप यांना एकत्र फेटून सर्व्ह करा बबलगम लस्सी.
गुलाब लस्सी : गुलाब सिरप, केसर मुळलस्सीमध्ये घालून त्याला फेटून घेऊन मस्त गुलाब लस्सी तयार होते. बस एक चमचा सिरपनी गुलाब लस्सी तयार करा.
किवी नोगड लस्सी : एक ग्लासला अर्धा ग्लास मुळलस्सी घेऊन चार काप किवींचे आणि नोगडचे ज्युसरमध्ये हे मिश्रण फिरवून घ्या आणि किवी नोगड फ्लेवर लस्सी तयार.
मुलांना शाळेतून आल्यावर आणि मोठ्यांना ऑफिसमधून आल्यावर तसेच तरूणांना भटकंती करताना पिण्याकरीता लस्सी हा प्रकार उत्तम व पौष्टिक ठरतो. पार्टीत असो वा घरी कुठेही मनं आणि आरोग्य तजेलदार ठेवणारे पेय ‘लस्सी’ एक उत्तम व्यवसायीक पेय आणि उत्तम स्वागताचा ग्रीष्मातील प्याला आहे. खाऊगल्लीत भटकंती करताना या पेयाची निवड आवर्जुन करा.