सण पारंपरिकतेचा
   दिनांक :04-Apr-2019
चै
त्राची सुरुवात ज्या दिवसाने होते, तो दिवस म्हणजे ‘गुढीपाडवा!’ हा सण प्रत्येक िंहदूच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी अभ्यंगस्नान करावे व सूर्योदयापूर्वी गुढी उभी करावी असे मानतात. गुडीपाडवासाठी पारंपरिक वेशभूषा उत्तम असून यामध्ये अनेक पर्याय बाजारात उपलब्ध आहेत. या सणानिमित्त अनेक जणांची भेटी-गाठी होत असून अनेक कार्यक्रमाचे आयोजन सुद्धा केले जाते. या निमित्त आपण चांगलं दिसायला पाहिजे, असे प्रत्येकाला वाटत असते. गुडीपाडवाला महिलांसाठी नऊवारी आणि पैठणीसारखे पर्याय उपलब्ध आहे. पुरुषांसाठी कुर्ता आणि धोती उत्तम आहे. वेषभूषेसह दागिन्यांवर सुद्धा विशेष लक्ष देण्याची आव्यश्यकता असते. वेशभूषेला शोभणारे फुटवेयर आणि हेयरस्टाईल सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे. वेगळ्या लूकसाठी फ्युजन आऊटफिट परिधान करता येते. अशाच काही पारंपरिक वेषभूषांबद्दल आज मी तुम्हाला सांगणार आहे.
 

 
 
वेशभूषा
गुडीपाडवासाठी नऊवारी आणि पैठणी साडी उत्तम असून स्टायलिश आणि वेगळे दिसण्यासाठी यामध्ये वेगळ्या िंप्रटची निवड करावी. पैठणीमध्ये हिरवा आणि जांभळा रंग सर्वत्र पाहायला मिळते. या रंगांव्यतिरिक्त लाल आणि विविध रंगांचे शेड असलेल्या साडीची सुद्धा निवड करता येते. तसेच सध्या चेक्स िंप्रटचे ट्रेंड जोरात असून नऊवारीमध्ये हे िंप्रट पाहायला मिळत आहे. पैठणी साडी परिधान केल्यास पदर मोकळे सोडावे. तसेच पदर मोकळे सोडायचे नसल्यास घडी घातलेले पदर सुद्धा शोभून दिसते. पैठणीमध्ये कमळ आणि तोता-मैनासारखे अनेक पर्याय उपलब्ध आहे. सिल्क आणि कॉटनची नऊवारी गुडीपाडवासाठी उत्तम आहे. मराठी िंकवा पेशवारी पद्दतीने नऊवारी परिधान करता येते. तसेच नऊवारीमध्ये विविध िंप्रट बाजारात उपलब्ध आहे. सध्या चेक्स िंप्रट ट्रेंडींगमध्ये असून हे िंप्रट स्टायलिश आणि वेगळे लूक देते. नऊवारीमध्ये भडक रंगाची निवड करावी. पिवळा आणि निळा रंग नऊवारीत शोभून दिसतो. पुरुषांसाठी धोती आणि कुर्ता उत्तम आहे. भडक रंगाच्या धोतीवर फिक्कट रंगाचा कुर्ता परिधान करावा. वेगळे लूक करण्यासाठी फ्लोरल िंप्रट असलेला कुर्ता सुद्धा निवडता येतो.
 

 
दागिने
साडीवर पारंपरिक दागिने शोभून दिसतात. सध्या चोकर ट्रेिंडगमध्ये असून हे गळातले साडीवर स्टायलिश आणि वेगळे लूक देते. तसेच साडीवर बाजू बंद आणि कमरबंद परिधान करणे विसरू नये. पारंपरिक दागिन्यांमध्ये नथ, ठुशी, मोहन माळ, लक्ष्मी हार, कोल्हापुरी साज, अंबाडा आणि वाकी सारख्ये पर्याय पाहायला मिळतात. नऊवारी आणि पैठणीवर पुणेरी नथ शोभून दिसते. गळ्यात मोहन माळ, राणी हार आणि ठुशी पारंपरिक लूक देते. नऊवारीवर ठुशी शोभून दिसते. पारंपरिक वेषभूषेवर केसांचा अंबाडा बांधल्यास त्यावर गजरा लावणे विसरू नये. कानात झुमका आणि बुगडी परिधान करावे. पारंपरिक दागिन्यांव्यतिरिक्त ऑक्सिडाईझ्ड दागिने सुद्धा महिलांमध्ये प्रसिद्ध आहे. हे दागिने जॉर्जेट आणि कॉटनसारख्या साडीवर शोभून दिसतात. पैठणी साडीवर या दागिन्यांमध्ये कानातले आणि हार परिधान करता येतो. राणी हार, गुलबंध आणि कॉलर नेकलेस सारखे पर्याय उपलब्ध असून हे नेकलेस प्रत्येक साडीवर शोभून दिसतात. गुलबंद नेकलेस कांजीवरम साडीवर घातल्यास स्टायलिश लूक मिळते.
पुरुषांसाठी नेहरू जॅकेटसारखे पर्याय उपलब्ध आहे. तसेच फुटवेयरमध्ये कोल्हापुरी चप्पल आणि जुती पारंपरिक वेषभूषेवर शोभून दिसते. महिलांनी पारंपरिक वेषभूषेवर आंबाडा िंकवा फिशटेल हेयरस्टाईल करावे. या व्यतिरिक्त मेसी बन आणि हाय बन सारखे हेयरस्टाईल सुद्धा पारंपरिक वेषभूषेवर करता येते. केसं मोकळे सोडायचे असल्यास केसांना कर्ल करावे. असे केल्याने पातळ केसं जाड दिसतात.
सृष्टी परचाके