'या' चित्रपटाच्या माध्यमातून लवकरच परतणार इरफान खान
   दिनांक :04-Apr-2019
 
 
इरफान खान लवकरच हिंदी मीडियम 2 सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. राजस्थानमध्ये राधिका मदनने या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. मुंबई मिररच्या रिपोर्टनुसार इरफान पुढच्या आठवड्यात शूटिंगला सुरुवात करणार आहे. राधिका सिनेमात इरफान खानच्या मुलीची भूमिका साकारणार आहे. पहिल्या शेड्यूलचे शूटिंग संपल्यानंतर दोघे इंटरनॅशनल शेड्यूलच्या शूटिंगसाठी रवाना होणार आहेत. आधी अमेरिका आणि नंतर लंडनमध्ये शूट होणार आहे.
 
 
 
 
करिना कपूर यात मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसणार आहे. करिना यात पोलिस अधिका-याची भूमिका साकारणार आहे. २०१७ मध्ये इरफानचा ‘इंग्लिश मीडियम’ प्रदर्शित झाला होता. यात त्याच्या अपोझिट पाकिस्तानी अभिनेत्री सबा कमर दिसली होती. या सिनेमाने ३०० कोटींचा बिझनेस करत अनेकांना आश्चर्याला धक्का दिला होता. त्यामुळे लगेच मेकर्सनी या चित्रपटाचा सीक्वल बनवण्याची तयारी सुरु केली होती. पण याचदरम्यान इरफानला न्युरोएंडोक्राईन ट्युमर कॅन्सरचे निदान झाले होते. यावरच्या उपचारासाठी इरफान लंडनला रवाना झाला होता. पण आता इरफान भारतात परतला आहे आणि आपल्या चाहत्यांच्या मनोरंजनासाठी तयार आहे.