एक आठवड्यात 'जंगली'ने कमविला इतका गल्ला
   दिनांक :04-Apr-2019
 
 
 

 
 
विद्युत जामवाल याची मुख्य भूमिका असलेल्या 'जंगली' चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. या चित्रपटाने केवळ सात दिवसांत बॉक्सऑफिसवर तब्बल १९. ७० कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे.
२९ मार्चला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने पहिल्याच दिवशी ३.३५ कोटींची कमाई केली. त्यानंतर आलेल्या वीकएन्डमुळे प्रेक्षकांनी चित्रपटगृहात गर्दी केली. माणूस आणि प्राणी यांच्यातील मैत्रीचं नातं दाखवणारा 'जंगली' चित्रपट लहान मुलांच्याही पसंतीस उतरतो आहे. त्यामुळे मुलांच्या परीक्षा संपल्याचा आणि त्यांना सुट्टया लागल्याचा फायदाही चित्रपटाला होईल असा अंदाज वर्तवला जात आहे.