रिपोर्ट कार्ड मूल्यांकनात राज्यातील खासदार अव्वल
   दिनांक :04-Apr-2019
एका एनजीओने देशातील खासदारांचे ‘रिपोर्ट कार्ड’ तयार केले असून त्यानुसार लोकसभेत सर्वाधिक उपस्थिती असलेल्या महाराष्ट्रातील खासदारांमध्ये मुंबई दक्षिणचे खासदार अरिंवद सावंत (97.3 टक्के) मुंबई उत्तरचे खासदार गोपाळ शेट्टी (97.3 टक्के) प्रथम आहेत. तर द्वितीय क्रमांकावर लातूरचे खासदार डॉ. सुनील गायकवाड यांचा (96.1 टक्के)आहेत. बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि मुंबई दक्षिण मध्यचे खासदार राहुल शेवाळे या दोघांचा (95.8 टक्के) पहिल्या पाचात समावेश आहे.
लोकसभेत सर्वाधिक चर्चामध्ये सहभाग घेणार्‍या महाराष्ट्रातील खासदारांमध्ये मावळचे खासदार श्रीरंग बारणे (297 चर्चात सहभाग) यांचा प्रथम क्रमांक लागतो. मुंबई दक्षिणचे अरिंवद सावंत (271 चर्चा) द्वितीय तर िंहगोलीचे राजीव सातव (233 चर्चा) तृतीय क्रमांकावर आहेत. मुंबई दक्षिण मध्यचे खासदार राहुल शेवाळे (203 चर्चा) चौथ्या, तर मुंबई उत्तर पूर्वचे खासदार डॉ. किरीट सोमय्या (162 चर्चा) हे पाचव्या क्रमांकावर आहेत.
 
 
 
स्वतंत्रपणे सर्वाधिक विधेयके मांडणार्‍या महाराष्ट्रातील खासदारांमध्ये शिरूरचे शिवाजीराव आढळराव पाटील आणि मावळचे श्रीरंग बारणे (20 विधेयके) यांचा प्रथम क्रमांक आहे. जळगावचे ए. टी. नाना पाटील (17 विधेयके) औरंगाबादचे चंद्रकांत खैरे (16 विधेयके) आणि मुंबई उत्तर मध्यच्या पूनम महाजन (9 विधेयके) यांचा पहिल्या पाच खासदारांमध्ये समावेश आहे.
2014 ते 2019 या कालावधीत खासदार निधीचा सर्वाधिक वापर करणार्‍या खासदारांमध्ये डॉ. किरीट सोमय्या (25.61 कोटी) यांचा प्रथम क्रमांक लागतो. वर्ध्याचे खासदार रामदास तडस (23.57 कोटी) यांचा द्वितीय, राहुल शेवाळे (20.88 कोटी) यांचा तृतीय क्रमांक लागतो. चौथ्या क्रमांकावर पूनम महाजन (20.62 कोटी) तर पाचव्या क्रमांकावर कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत िंशदे (20.39 कोटी) आहेत. राजेंद्र गावित, मधुकरराव कुकडे आणि विजयिंसह मोहिते पाटील या तीन खासदारांनी पाच वर्षांत लोकसभेतील एकाही चर्चेत सहभाग घेतला नाही.