पंतप्रधान नरेंद्र मोदींना यूएईचा सर्वोच्च पुरस्कार
   दिनांक :04-Apr-2019
नवी दिल्ली:
 
 
 
संयुक्त अरब अमिरातकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा 'झाएद पदका'नं सन्मान करण्यात येणार आहे. दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्यासाठी मोदींनी केलेल्या प्रयत्नांची दखल घेऊन त्यांना हा सर्वोच्च नागरी सन्मान दिला जाणार आहे. गेल्या काही वर्षांमध्ये दोन्ही देशांमधील संबंध एका वेगळ्या उंचीवर जाऊन पोहोचले. यामध्ये मोदींचा मोठा वाटा असल्याने  त्यांना हा सन्मान जाहीर करण्यात आल्याची माहिती अबूधाबीचे क्राऊन प्रिन्स शेख मोहम्मद बिन जायद यांनी ट्विट करुन दिली. याआधी महाराणी एलिजाबेथ, जॉर्ज डब्ल्यू बुश, व्लादिमीर पुतिन, निकोलस सरकोजी, क्षी जिनपिंग आणि अँजेला मर्केल यांना 'झाएद पदका'ने  गौरवण्यात आले आहे.