फेसबुक युजर्सला मागत आहे ईमेल पसरवर्ड; 'हे' आहे कारण
   दिनांक :05-Apr-2019
नवी दिल्ली:
 फेसबुकच्या करोडो युजर्सचा डेटा लीक झाल्याची माहिती काही दिवसांपूर्वी समोर आली होती. ६० कोटी युजर्सचा पासवर्ड फेसबुकमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना माहिती पडला त्यामुळे युजर्सची प्रायव्हसी धोक्यात आली होती. युजर्सचा डेटा चोरीला गेल्याची बाब समोर असतानाच आता कोट्यवधी फेसबुक युजर्सचा डेटा अ‍ॅमेझॉन क्लाउड सर्व्हरवर लीक झाला आहे. दरम्यान फेसबुक आपल्या प्लॅटफॉर्मवर येणाऱ्या युजर्सकडे त्यांच्या ई-मेलचा पासवर्ड मागत आहे.
 
 
डेलीबीस्टच्या एका रिपोर्टनुसार, फेसबुकने काही युजर्सना त्यांच्या लॉग इन पेजवर एक मेसेज केला आहे. त्यामध्ये युजर्सना त्यांच्या पर्सनल ई-मेलचा पासवर्ड द्यावा लागत आहे. मात्र ज्या आयडीने हे फेसबुक अकाऊंट ओपन केलं आहे तो पासवर्ड देणं गरजेचं आहे. फेसबुक अकाऊंट सुरू करण्यासाठी तुम्हाला तुमचा ई-मेल आय डी द्यावा लागेल. त्यानंतर एका फॉर्मच्या माध्यमातून युजर्सना त्यांचा पासवर्ड विचारला जात आहे. याआधी युजर्सने अन्य डिवाईसवरून अकाऊंट ओपन केल्यास अशा प्रकराचे पर्याय मिळत होते. आम्हाला माहित आहे की अकाऊंट सुरक्षिततेसाठी पासवर्ड व्हेरिफीकेशनचा हा मार्ग बेस्ट नाही आहे. त्यामुळे आम्ही तो बंद करण्याचा विचार करत असल्याचं फेसबुकने म्हटलं आहे. त्यामुळे अकाऊंटच्या अधिक सुरक्षिततेसाठी यासारखाच एक नवा पर्याय निवडण्यासाठी फेसबुक आपल्या प्लॅटफॉर्मवर येणाऱ्या युजर्सकडे त्यांचे पासवर्ड मागत असल्याची माहिती मिळत आहे.