माझ्या बायोपिकमध्ये आलियाने करावे काम- माधुरी दीक्षित
   दिनांक :05-Apr-2019
अभिनेत्री माधुरी दीक्षित सध्या संजय दत्त, आलिया भट्ट, वरुण धवन, आदित्य रॉय कपूर आणि सोनाक्षी सिन्हा सह ‘कलंक’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान एका मुलाखतीमध्ये माधुरी दीक्षितने भविष्यात तिच्यावर बायोपिक तयार करण्यात आला तर त्यामध्ये आलिया भट्टने तिची भुमिका साकारावी असे म्हटले. पण आलियाला त्यासाठी तिच्या नृत्यावर थोडे काम करावे लागेल असेही ती पुढे म्हणाली.
 
 
‘भविष्यात माझ्यावर बायोपिक बनवण्यात आला तर आलिया भट्ट माझ्या भुमिकेला साजेशी आहे. परंतु तिला आणखी थोडे कथ्थक नृत्याचे धडे घ्यावे लागणार आहेत. ‘हायवे’, ‘गली बॉय’ आणि ‘राझी’ चित्रपटामध्ये तिने सुंदर असा अभिनय केला आहे. जर तिने माझी भुमिका साकारली तर मला मनापासून आवडेल पण तिला नृत्याकडे थोड लक्ष द्यावे लागेल’ असे माधुरी म्हणाली.
 

 
‘कलंक’ चित्रपाटात तब्बल २५ वर्षानंतर माधुरी आणि संजय दत्त एकत्र दिसणार आहेत. धर्मा प्रॉडक्शन्स निर्मित हा चित्रपट १७ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार असून माधूरी आणि संजय दत्तची जोडी पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.