'नो लॅन्ड्स मॅन'वर आधारित सिनेमात दिसणार 'हा' अभिनेता
   दिनांक :05-Apr-2019
लेखक आसिम मांडवीचे 'नो लॅन्ड्स मॅन' हे पुस्तक अमेरिकेत स्थलांरित झालेल्या भारतीयांच्या दुसऱ्या पिढीच्या आयुष्यावर भाष्य करते. आसिफ मांडवीचा विद्यार्थ्यापासून एक अभिनेता बनण्यापर्यंतचा प्रवास या पुस्तकात रेखाटला आहे. मुस्तफा सरवार फारुकी हा बांग्लादेशी दिग्दर्शक या पुस्तकावर आधारित चित्रपटाचे दिग्दर्शन करतो आहे. याशिवाय मौनी रॉय सोबत 'बोले चुडियाँ' या चित्रपटातही नवाजुद्दीन सिद्दीकी काम करतो आहे.
 

 
नवाजुद्दीन सुरुवातीपासूनच वेगळ्या भूमिकांसाठी प्रसिद्ध आहे. तलाश, ठाकरे,गॅंग्ज ऑफ वसेपूर, सर्वच चित्रपटांमध्ये वेगळ्या आशयाच्या भूमिका त्याने साकारल्या आहेत. तेव्हा नो लॅन्ड्स मॅन वरील चित्रपटातून नवाजुद्दीन प्रेक्षकांची मनं जिंकतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.