राष्ट्रपती, पंतप्रधानांच्या गुढीपाडव्याच्या शुभेच्छा
   दिनांक :05-Apr-2019

 
 
 
नवी दिल्ली : राष्ट्रपती रामनाथ कोिंवद, उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. सोबतच, चैत्र सुकलददी, उगादी, चेती चांद यासारख्या सणांसाठीही देशाला शुभेच्छा दिल्या. या सर्व सणांमुळे समाजात प्रेम आणि सलोख्याचे बंध आणखी घट्ट व्हावे, अशी इच्छा राष्ट्रपतींनी टि्‌वटरवर व्यक्त केली. पंतप्रधान मोदी यांनीही हे सर्व सण आनंदात जावो, अशी भावना व्यक्त केली आहे.