‘व्हीव्हीपॅट’मधील स्लीपची गणना करा
   दिनांक :05-Apr-2019
 
 
 नागरिक कृती समितीची मागणी
 
 
भंडारा : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची मतगणना करताना ‘इव्हीएम’ मशीनमधील कंट्रोल युनिटसह ‘व्हीव्हीपॅट’मधील प्रिंट  झालेल्या स्लीपची गणना करणारा निर्णय निवडणूक आयोगाने घ्यावा, अशी मागणी नागरिक कृती समितीतर्फे करण्यात आली आहे. मागणीचे निवेदन निवडणूक आयोग, पंतप्रधान कार्यालयाला पाठविण्यात आले आहे.
 

 
 
लोकसभा निवडणूक इव्हीएम, व्हीव्हीपॅटच्या साहाय्याने होत आहे. निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मतगणना करतेवेळी फक्तयुनिट कंट्रोलमधील सेव्ह असलेल्या मतांची गणना केली जाते. मात्र, व्हीव्हीपॅटमध्ये प्रिंट झालेल्या स्लीपची गणना करून पडताळणी केली जात नसल्याने मतदारांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. मतदारांचे समाधान करण्यासाठी व खात्री होण्यासाठी तसेच निवडणूक प्रक्रियेवरील विश्वासार्हता कायम राहावी यासाठी प्रिंट झालेल्या स्लीपची गणना करावी, अशी मागणी मतदार, विविध सामाजिक संघटना व नागरिक कृती समिती केली आहे. मागणीकडे दुर्लक्ष केल्यास तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. मागणीचे निवेदन निवडणूक आयोग, पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले आहे.