रहस्य मोदींच्या फिटनेसचं
   दिनांक :05-Apr-2019
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील सरकारच्या कारभारातील काही प्रमुख बाबी महत्त्वाच्या ठरल्या. स्वत: नरेंद्र मोदींच्या कामाचा आवाका प्रचंड आहे. ते दिवसातले 16 ते 18 तास काम करतात. त्यांनी या कार्यकाला देशोदेशीच्या यात्रा केल्यात. नरेंद्र मोदींचा उत्साह आणि तंदुुरूस्तीचं आपल्याला खूप कुतुहल वाटतं. मोदींचा दैनंदिन कार्यक्रम कसा असतो? दिवसभराचा उत्साह ते कसा टिकवून ठेवतात? तंदुरूस्तीसाठी ते काय करतात? या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्याचा हा एक प्रयत्न...
 

 
 
* रात्री झोपायला उशीर झाला तरी मोदी पहाटे 4 वाजता उठून योगासनं करतात. सूर्य नमस्कार, प्राणायाम आणि योगासनांमुळे त्यांचा उत्साह टिकून राहतो.
* मोदी नियमितपणे चालतात. यामुळे रक्ताभिसरणाची प्र्रक्रिया सुरळीत होते.
* दीर्घश्वसनाचे अनेक लाभ आहेत. मोदीही दिवसातून अनेकदा दीर्घ श्वसन करतात. यामुळे फुफ्फुसात ऑक्सिजनचा प्रवाह सुरळीत सुरू राहतो. शरीराला ऊर्जा मिळते.
* मोदी सकाळी चहासोबत खाकरा, पोहे, भाकरी असा हल्का आहार घेतात. यामुळे ते दिवसभर उत्साही राहतात.
* मोदी शुद्ध शाकाहारी आहेत. जेवणात ते फळं आणि भाज्या घेतात. साधं गुजराती िंकवा दक्षिण भारतीय जेवण त्यांना भावतं. मसालेदार पदार्थ ते कटाक्षाने टाळतात. साध्या आहारामुळे पोट जड होत नाही.
* मोदींनी आपल्या आहाराची विभागणी केली आहे. एकाच वेळी ते भरपेट जेवत नाहीत. मधल्या वेळी ते फळं िंकवा हलके पदार्थ खातात. यामुळे झोप आणि थकवा येत नाही.
* दिवसभरात ते कोमट पाणी पितात. यामुळे शरीराची ऊर्जा टिकून राहते.
* नवरात्रींमध्ये मोदीजी नऊ दिवस उपवास करतात. या काळात ते फक्त िंलबू पाणी पितात. इतर दिवशीही ते उपवास करतात. यामुळे शरीरातली विषद्रव्यं बाहेर पडतात. शरीर आतून स्वच्छ होतं.
* मोदी नियमित मेडिटेशन करतात. यामुळे ताण, मानसिक आणि शारीरिक थकवा दूर होतो. शारीरिक ऊर्जा टिकून राहते.
* दिवसभरात ते अवघी 3 ते 4 तास झोप घेतात. पण सकाळी उठल्यावर उत्साही असतात.
* मोदी अध्यात्मिक पुस्तकं वाचतात. यामुळे त्यांचं मानसिक आरोग्य उत्तम राहतं.