पाकिस्तानचं एफ-१६ सुरक्षित? ; अमेरिकन मासिकाचा दावा
   दिनांक :05-Apr-2019
न्यू यॉर्क:
 
पाकिस्तानी हवाई दलाच्या ताफ्यातील सर्व एफ-१६ विमानं सुरक्षित असल्याचा दावा अमेरिकेच्या एका मासिकानं केला आहे. पाकिस्तानचं एफ-१६ पाडल्याचा भारताचा दावा चुकीचा असू शकतो, असं 'फॉरेन पॉलिसी' या मासिकाने  आपल्या वृत्तात म्हटले  आहे.  या प्रकरणाशी थेट संबंध असलेल्या दोन अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीवरुन वृत्त दिल्याचं मासिकानं म्हटलं आहे.
 
 
पाकिस्तानने अमेरिकेकडून एफ-१६ विमाने खरेदी केली होती. या विमानांची मोजदाद केल्यास ती योग्यच असल्याचे दोन अधिकाऱ्यांनी मासिकाला सांगितले. एक एफ-१६ विमान पाडल्याचा भारताचा दावा विचारात घेतल्यास पाकिस्तानच्या ताफ्यात एक विमान कमी असायला हवं होतं. मात्र तसं झालेलं नाही, अशी माहिती या अधिकाऱ्यांनी दिली. पुलवामा हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलानं २६ फेब्रुवारीला एअर स्ट्राइक केला. यानंतर २७ फेब्रुवारीला पाकिस्तानच्या लढाऊ विमानांनी भारतीय हवाई हद्दीत घुसण्याचा प्रयत्न केला. मात्र तो निष्फळ ठरला.