आरोग्यदायी किंलगड बिया
   दिनांक :05-Apr-2019
न्हाळ्याच्या दिवसांत किंलगड हे आवर्जून खाल्ले जाणरे फळ आहे. या फळामध्ये पाण्याची आणि फायबरची मात्रा भरपूर असल्याने उन्हाळ्याच्या दिवसांत हे फळ खाण्याचा सल्ला आहारतज्ज्ञ देतात. पण किंलगड खाताना किंलगडाच्या बिया मात्र आपण काढून टाकत असतो. वास्तविक किंलगडाच्या गराइतक्याच किंलगडाच्या बिया देखील आपल्या आरोग्याला अतिशय लाभदायक आहेत. किंलगडाच्या बियांच्या सेवनाने हृदयाचे कार्य सामान्य राहते, तसेच रक्तदाबही नियंत्रित राहतो. या बियांचे सेवन केसांच्या आरोग्याकरिता ही उत्तम आहे. ज्यांचे केस जास्त गळतात त्यांनी किंलगडाच्या बियांचे सेवन केल्यास त्यांच्यामध्ये असलेल्या पोषक तत्त्वांमुळे केसांची मुळे बळकट होतात आणि केसगळती कमी होते.
 
 
 
किंलगडाच्या बियांमध्ये मॅग्नेशियम मुबलक प्रमाणात असल्याने यांच्या सेवनाने त्वचेचे आरोग्य चांगले राहून त्वचा नितळ बनण्यास मदत होते. या बियांच्या सेवनाने पचनास सहायक अशी पोटातील एन्झाईम्स सक्रीय होत असल्याने आपण खाल्लेया अन्नातील पोषक तत्त्वे शरीरामध्ये अधिक प्रभावीरित्या अवशोषित होतात. एक औंस किंलगडाच्या बियांमध्ये 158 कॅलरीज असून 0.29 मिलीग्राम लोहही यामध्ये असते. किंलगडाच्या बियांचे सेवन निरनिराळ्या प्रकारे करता येऊ शकते. या बिया किंलगडातून काढून घेऊन वाळवून खाल्ल्या जाऊ शकतात, िंकवा बिया वाळवून त्यामध्ये थोडेसे मीठ घालून तव्यावर कोरड्या भाजून घेऊन खाल्ल्या जाऊ शकतात. त्याचप्रमाणे या बियांना मोड आणूनही या बियांचे सेवन केले जाऊ शकते. त्यामुळे आता किंलगड खाताना त्याच्या बिया टाकून न देता आपल्या आहारामध्ये अवश्य समाविष्ट कराव्यात.