काँग्रेस आणि बिजदने गरीबांचा व्होट बँकेसाठी केला वापर : नरेंद्र मोदी
   दिनांक :06-Apr-2019
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (दि.६) ओडीशाच्या प्रचार दौऱ्यावर आहेत. दरम्यान, सोनेपूर येथील एका प्रचार सभेला संबोधित करताना काँग्रेस आणि बिजू जनता दलावर (बिजद) सडकून टीका केली. या दोन्ही पक्षांनी गरीब जनतेचा केवळ राजकारणासाठी वापर केला, असा आरोप त्यांनी केला.

 
मोदी म्हणाले, गरीबांचा व्होट बँकेसाठी वापर करण्याच्या काँग्रेस आणि बिजदच्या धोरणांमुळे अनेक दशकांपासून ओडिशासह देशभरातील मोठा भाग हा दारिद्र्य रेषेखाली राहिला आणि त्यामुळेच याचा गैरवापर नक्षलवाद्यांनी केला.
 
यावेळी राष्ट्रवादाची भुमिका मांडताना मोदी म्हणाले, या निवडणुकाच आता ठरवतील की देशाचे खरे हिरो असणारे अधिक सक्षम होतील की पाकिस्तानचा पुरस्कार करणारे होतील. आमच्या जवानांना, शेतकऱ्यांना आणि तरुणांना सन्मान मिळेल की टुकडे-टुकडे म्हणणाऱ्यांचा आवाज घुमेल.