आजचे राशी भविष्य, दि. ०६ एप्रिल २०१९
   दिनांक :06-Apr-2019
 
 
मेष : स्वत:च्या कामांवरच लक्ष द्या. तुमच्या विचारांमध्ये काही महत्त्वाचे बदल घडून आलेले असतील. अर्थार्जनासाठी काही महत्त्वाच्या संधी मिळतील. काही महत्त्वाच्या व्यक्तींना भेटण्याची संधी मिळेल.
 
वृषभ :  गुंतवणूकीच्या व्यवहारांच्या नव्या संधी मिळतील. कोणा एका कामाचा पुढे नेण्यासाठी प्रयत्न कराल. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामाची प्रशंसा करतील.
 
मिथुन : आर्थिकदृष्ट्या यश मिळेल. आज इतरांना तुमचा फायदा होईल. नोकरीच्या ठिकाणी नम्रतेने वागा. दूरच्या ठिकाणहून एखादी चांगली बातमी मिळू शकते. तुम्हाला काही जबाबदाऱ्याही मिळू शकतात.
 
कर्क : मित्र किंवा नातेवाईकांची अनुपस्थिती जाणवेल. काही बाबतीत धनलाभ होण्याची शक्यता आहे. काही नाती आणखी दृढ करण्याचा प्रयत्न कराल. काही महत्त्वाची कामं पूर्णत्वास जातील.
 
सिंह : एखादी नवी योजना पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल. नोकरीच्या ठिकाणीही काही जबाबदारीची कामं मिळतील. एखाद्या अशा व्यक्तीची ओळख होईल ज्याचा भविष्यात तुम्हाला फायदा होणार आहे.
 
कन्या : धनलाभ होण्याची चिन्हं आहेत. अडकलेले पैसे परत मिळतील. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांवर तुमचा प्रभाव असेल. नवी जबाबदारी मिळेल.
 
तूळ : शेअर मार्केटमध्ये विचार करून गुंतवणूक करा. बॉससोबत सावध राहा. तुमच्या करियरसाठी महत्त्वाच्या असलेल्या व्यक्ती त्रासदायक ठरतील. महत्त्वाचे काम पूर्ण न झाल्यास ताण घेऊ नका. संयम ठेवा. शांतपणे दिवस व्यतित करा.
 
वृश्चिक : सहकाऱ्यांची मदत होईल. ज्यांच्याकडून अपेक्षा आहे, त्या व्यक्तींची सहज मदत मिळेल. सकारात्मक दृष्टीकोन ठेवा आणि त्याच वाटचेने पुढे जा. आर्थिक परिस्थिती सुधारेल.
 
धनु : मेहनतीचे फळ मिळेल. तुमच्या इच्छा पूर्ण होतील. बढतीची संपूर्ण शक्यता आहे. कोणतीही संधी सोडू नका. जे काम हाती घ्याल त्या कामात आवश्यक ती मदत मिळेल. लोकांडून तुमची कामं करून घेण्यास यशस्वी व्हाल. दिवस चांगला आहे. तब्येत ठीक राहील.
 
मकर : नोकरी किंवा व्यवसायाच्या बाबतीत काही महत्त्वाचे बेत आखाल. इतरांच्या भावनांचा विचार करा. व्यवसायामध्ये यश मिळल्यासाठी मोठ्या उत्साहाने काम करा.
 
कुंभ : नशीबाची साथ मिळेल. कमी मेहनतीचा जास्त फायदा होईल. काही बाबतीत आजचा दिवस चांगला असेल. वरिष्ठ तुमच्या कामाने प्रभावित होतील.
 
मीन : आज जबाबदारी वाढेल. नोकरीच्या ठिकाणी सर्व गोष्टी सुरळीत ठेवण्यासाठी स्वत:च्या पातळीवर काही प्रयत्न करा. येणाऱ्या दिवसांमध्ये याचा तुम्हाला फायदाच होईल. कामात प्रामाणिकपणा ठेवा.