पार पडले लोकसभा निवडणूक २०१९ मधील पहिले मतदान
   दिनांक :06-Apr-2019
लोकसभा निवडणूक २०१९ मधील पहिले मतदान आज (दि.६) अरुणाचलमध्ये पार पडले. मात्र, हे मतदान सर्वसामान्य जनतेसाठी नव्हते तर इंडो-तिबेटिअन बॉर्डर पोलिसांसाठी होते. या जवानांनी आज पोस्टल बॅलटच्या माध्यमांतून यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावला. अरुणाचल प्रदेशच्या लोहितपूर येथे ही मतदान प्रक्रिया पार पडली.
 

 
संपूर्ण देशात ७ टप्प्यांमध्ये लोकसभा निवडणूक पार पडणार आहे. यातील पहिल्या टप्प्याचे मतदान येत्या ११ एप्रिल रोजी होणार आहे. दरम्यान, तत्पूर्वीच आज पहिले मतदान अरुणाचल प्रदेशात पार पडले. येथील दुर्गम भागात असलेल्या भारत-तिबेट सीमा पोलिसांच्या युनिटसाठी आज लोहितपूर येथे हे गुप्त पोस्टल मतदान झाले.